शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप

शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप

काळेवाडी, दि. 22 ऑक्टोंबर 2022 : अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने नागरिकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जीवन सुखमय व्हावे. या हेतूने शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन काळे या दांपत्याने सुमारे 6,000 कुटूंबांना दिवाळीनिमित्त पणत्या वाटप करत दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. मागील तीन वर्षापासून काळे हा उपक्रम राबवत आहेत.

सचिन काळे व कोमल काळे यांचे सामाजिक कार्य सर्वश्रृत आहे. ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवून आपणही समाज्याचे देणे लागतो, याची नेहमीच जाणीव करून देत असतात. कोणताही सण किंवा उत्सवात नागरिकांच्या आनंदातच आपला आनंद शोधणारे काळे दांपत्य आता नागरिकांच्या हक्काचे नेतृत्य म्हणून उदयास आले आहे.

कोरोना महामारी काळात नागरिक भितीच्या व दुखा:च्या वातावरणात होते. या प्रसंगातून बाहेर पडावे व अंधकारातून पुन्हा प्रकाशमान जीवनाकडे वाटचाल करावी, गरिबांच्या घराची दिवाळीही प्रकाशमान व आनंदायी व्हावी, म्हणून कोरोना काळात कोमल काळे व सचिन काळे यांनी नागरिकांना धिर देत पणत्या वाटप केल्या. तेव्हापासून काळे दांपत्य नागरिकांच्या घरोघरी जाऊन दर दिवाळीला पणत्या वाटप करत आहेत.