मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई

मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई

पिंपरी, (लोकमराठी) : डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने त्यावर आवश्यक फवारणी करण्यात आली व पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई नुकतीच करण्यात आली.

डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. मंगळवार (दि. १२) रोजी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, आरोग्य निरीक्षक व्ही.के. दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन गौडार, सचिन जाधव, संपत भोईटे यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली.

डास नियंत्रण, जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. लेबर कॅम्प अथवा बांधकामाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई