
पिंपळे गुरव, दि. ९ : बट्टू जगताप उद्यान शाखा व ८ ते ८० उद्यान सुदर्शन चौक पिंपळे गुरव, शाखा यांच्या संयुक्तरीत्या जागतिक महिला दिन बटटू जगताप उद्यान पिंपळे गुरव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिवाराचे संस्थापक अॅड.प्रताप साबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन अथर्व आयुर्वेद क्लिनिकचे डॉ. निनाद नाईक, डॉ. सुवर्णा वानखडे (थोरात) वृक्षमित्र अरूण पवार, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, महादेव पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. निनाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यकमात अॅड. प्रताप सावळे यांनी पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून करण्यात आले.
कायर्कमात सर्वप्रथम स्वागतपर महिला दिनावर आधारीत " घे ग तू भरारी" हे गीत मिना कुलकर्णी, उपा लोखंडे, लक्ष्मी निंबाळकर यांनी सादर केले. वृक्षमित्र अरूण पवार व सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांच्या हस्ते यांनी सर्व उपस्थित महिलांचा सत्कार ज्ञानेश्वरी व शाल व पुष्प देवून करण्यात आला. राहुल जवळकर यांनी आपल्या भाषणात महिलाप्रती गौरवोदगार व्यक्त करताना म्हटले, महिला सुखी तर घर सुखी, घर सुखी तर समाज सुखी, समाज सुखी तर देस सुखी हयाप्रमाणे एस. पीज हास्ययोग परविार महिलांना नकारात्मकता, नैराश्य, एकटेपणा, चिंता घालवून प्रेरणा, उर्जा, आरोग्य, आनंद व आदर देत आहे, त्याबद्दल परिवार संस्थापक अॅड प्रताप साबळे यांचे मनापासून कौतुक केले. माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे यांनी देखिल महिलांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व अथर्व आयुर्वेद क्लिनिकचे डॉ. निनाद नाईक व डॉक्टर सुवर्णा वानखडे (थोरात) यांनी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीच्या गर्भाशय सबंधातील विकार, त्वचा विकार, केसासबंधी केस पांढरे होणे, स्थूलता वजन वाढणे, व्यंधत्वाचे निराकरण, पी.सी.ओ.डी, डायबेटीस व उन्हाळ्यातील आजर यावर आधारीत योग्य आहार विहार जिवनशैली व पथ्य यावर खूपच उपयोगी माहिती महिला व बंधूनाही दिली सुवर्णा वानखडे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या व वैधकिय खर्चात पन्नास टक्के सवलत जाहिर केली.
ह्याप्रसंगी सुनिता लांडे, पार्वती टिळेकर, आशा निर्मल, अनिता कांवळे, वेदिका गोसावी, कविता गायकवाड, अनिता गुजर, रंजना साळवे, गीता शिरोळे, संगिता झोपे, संगिता मोरे, वंदना कोळी, महालक्ष्मी बागवे, शुभदा माने, अलका गायकवाड, कल्पना चंदनशिवे, मीता रौदाळे, पंकज घोगरे, महेश भस्के, गजानन शिंदे, प्रकाश गायकवाड, निलकंठ नवले, मनोज खंडागळे, अजिंक्य कुलकर्णी व ईतर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या रेखा दूधभाते यांच्यावतीने सर्वांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. अॅड. प्रताप साबळे यांनी कार्यकमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.