PIMPRI CHINCHWAD: आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न

PIMPRI CHINCHWAD: आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न

पिंपरी :यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे क्रिसेंडो हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होते, असे डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. चिंचवड येथील एल्प्रो सभागृहात या क्रिसेंडो कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कला, क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व सांगीतिक कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ.वंदना मोहंती, डॉ.अश्विनी ब्रह्मे, प्रा.गंगाधर डुकरे, प्रा.युगंधरा पाटील, प्रा. विद्या उगरे व प्रा.करिष्मा कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.

मान्यवरांची प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्याने, प्राध्यापक वर्गाकडून मिळालेली कौतुकाची थाप, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी केलेले सामूहिक सादरीकरण या सर्वांमुळे आयआयएमएसच्या एमबीए, एमसीए, बीबीए व बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिसेंडो हे वार्षिक स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.