३५ लाखांच्या खंडणीखोरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार तासात केले अटक; मॅनेजरची सुखरुप सुटका

३५ लाखांच्या खंडणीखोरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार तासात केले अटक; मॅनेजरची सुखरुप सुटका

पिंपरी : शेअर ट्रेडिंग व्यवसायाच्या वादातून थेट मॅनेजरचे अपहरण करुन 35 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरण कर्त्यांना गुन्हे शाखा युनिट 2, निगडी पोलीस, खंडणी दरोडा विरोधी पथकाने चार तासात अटक केले आहे. अपहरण कर्त्यांकडून दोन अलिशान कार, एक बजाज पल्सर व सात मोबाईल फोन असा एकुण 61 लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला असून अपहरण केलेल्या मॅनेजरची सुखरुप सुटका केली.


मुख्य सुत्रधार हरिचंद्र बारकु राजीवाडे (वय- 40, रा.बापदेवनगर, किवळे, देहुरोड), शशांक जगन्नाथ कदम (वय- 39 वर्ष रा. किसन कृपा बिल्डिंग, हॉटेल घरोंदा जवळ, पिंपरी) यांच्या सोबत तुळशीराम पोकळे (वय-34 वर्ष रा. नढे नगर, हिरा पॅलेस बिल्डिंग, काळेवाडी) याला ताब्यात घेऊन इतर सहभागी आरोपी अमर कदम, विकी गरुड, उमेश मोरे यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर आशुतोष अशोक कदम (वय- 28 वर्ष रा.जी विंग, फ्लॅट नं.14 शिवतीर्थ नगर, श्रीनगर, रहाटणी), राहुल बसवराज माळवे (वय-22 वर्ष रा.फ्लॅट नं. 19, गणेश अपार्टमेंट, तापकीर कॉलनी, काळेवाडी) अशी खंडणीची रक्कम स्विकारण्यासाठी आलेल्यांची नावे आहेत.


हि घटना आकुर्डीतील हॉटेल सिल्वर सेवन येथे शनिवार (ता.10) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. राहुल तिवारी (वय-27 वर्ष) असे अपहरण केलेल्या मॅनेजरचे नाव होते. या प्रकरणी राजकुमार मनोहर सिंग (वय-43 वर्ष) यांनी फिर्याद दिली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, शेअर ट्रेडिंग व्यवसायातुन निर्माण झालेल्या वादातुन मॅनेजर तिवारी याचे अपहरण करण्यात आले होते. व्यवसायाची रक्कम घेण्यासाठी ते आकुर्डीत आले होते. दरम्यान, मॅनेजरकडून 5 लाख घेऊन आँडी गाडीत मारहाण करुन एक दिवस गाडीतच फिरवले. गहुंजे येथील बिल्डिंग मध्ये रात्रभर नग्न आवस्थेत डांबुन ठेवत 35 लाखाच्या खंडणीची मागणी केली. निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांनी तपासाची चक्रे फिरवली. तीन पथके तयार करुन अपहरणकर्त्यांच्या मागावर रवाना केली. पोलीसांनी अपहरणकर्त्यांना खंडणीची रक्कम स्विकारण्यास बोलावून सापळा रचून बसलेल्या गुन्हे शाखा युनीट 2 आणि खंडणी दरोडा विरोधी पथकाने मोठ्या शिताफिने दोघांना ताब्यात घेऊन निगडी पोलीसांच्या ताब्यात दिले. निगडी पोलीसांनी तांत्रिक मुद्यांच्या आधारे या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला व त्याच्या साथीदाराला गहुंजे परीसरातुन ताब्यात घेतले. मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतल्याचे समजताच अपहरणकर्त्यांनी राहुल तिवारी याला डांगे चौकात सोडून पळ काढला.


न्यायालयाने अपहरणकर्तांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त(गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त सुनिलकुमार पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, गुन्हे शाखा युनीट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक पोलीस निरीक्षक एल.एन.सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, डी.एस.कोकाटे, के.बी.माकणे, पोलीस हवालदार किशोर पढेर, सतिश ढोले, राजेंद्र जाधव, पोलीस नाईक शंकर बांगर, रमेश मावसकर, सुनिल जाधव, शिवाजी नागरगोजे, विलास केकाण, पोलीस शिपाई विनोद व्होनमाने, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंगजे, अमोल साळुंखे, उमेश मोहिते, दिपक जाधवर, कंठ्या स्वामी, इरफान मोमीण, तानाजी सोनवणे तसेच गुन्हे शाखा यनीट 2 चे शिवानंद स्वामी, चेतन मुंढे, प्रमोद वेताळ, सानप, जयवंत राऊत, जमीर तांबोळी आणि खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.