
पीसीयू स्कूल ऑफ लॉ मध्ये महिला सक्षमीकरणावर परिषद संपन्न
पिंपरी, पुणे (दि. ९ मार्च २०२५) आजची स्त्री ही आधुनिक विचारांची आहे. तिच्या सक्षमीकरणासाठी तिचा स्वतःवर विश्वास हवा. नवीन कायद्याची माहिती झाल्यास आजची आधुनिक स्त्री अधिक सक्षम होईल असे मत पुणे, शिवाजीनगर न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) अमृत बिराजदार यांनी व्यक्त केले.
पीसीइटी एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पीसीयू मधील स्कूल ऑफ लॉ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त "लिंग आधारित हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नवीन गुन्हेगारी कायद्याद्वारे महिला सक्षमीकरण" या विषयावर आयोजित केलेल्या "पीसीयू लेक्स इम्पेरियम २०२५" या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी परिषदेस कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. दुर्गा दत्त, त्रयमा लीगलचे संस्थापक ललित कुमार झुंझुनवाला, विभागप्रमुख प्रियांक राणा, सहा. प्रा. प्रदीप यादव, पुलकित अग्रवाल, अदिती चौबे, स्कूल ऑफ लॉ चे प्राध्यापक आणि बीए. एलएलबी आणि एलएलबी चे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी आणि कायदेशीर व्यावसायिकांना संवाद साधण्यासाठी, त्यांचे अनुभव सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
या परिषदेत पीसीयूच्या स्कूल ऑफ लॉची महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवर जागरुकता आणि शिक्षणाला चालना देण्यासाठीची वचनबद्धता असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी उपस्थितांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.