Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना 

पिंपळे गुरव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाचे आगमन शिवमुद्रा रथामधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात झाले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून लहान मुले, महिला, पुरुष यावेळी सहभागी झाले होते.

मंडळाचे हे ५१ वर्षे असून औंध येथील चंद्रकांत कदम ढोल-ताशा लेझीम पथकाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकी वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंडळाने या वर्षी ‘ जागर देवीचा ‘ हा आकर्षक देखावा सादर केला आहे. तसेच यावर्षी मंडळाने अनाथ आश्रमाला मदत करण्यासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला असून अनाथ आश्रमातील मुलांना आरतीचा मान दिला जाणार आहे. त्याचबरोबर अन्नदान केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाणार असून रक्तदात्यास छोटेसे गिफ्ट देणार येणार आहे. असी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मोरे, उपाध्यक्ष्य गणेश कुंभार, कार्याध्यक्ष मनीष चव्हाण यांनी दिली.