कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे

कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे 

पुणे (लोकमराठी न्यूज) : कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे या संस्थेची महाराष्ट्र नवनिर्वाचित कार्यकारणी २०२३-२०२४ नुकतीच जाहीर करण्यात आली. रुपेश मोरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्ती कार्यकारिणीचा सत्कार पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मेत्रे वस्ती (चिखली) येथे करण्यात आला.

उपाध्यक्षपदी संदीप जाधव व मंगेश घाग, सचिवपदी प्रा. संदीप सकपाळ, सहसचिवपदी समीर चव्हाण, कार्याध्यक्षपदी संतोष कदम व राहुल ढेबे, खजिनदारपदी नंदकुमार महाडिक व महेश गोरे तसेच उत्सव कमिटी अध्यक्षपदी कैलास मोरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी अठरा गाव मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम कॅप्टन श्रीपत कदम, गजानन मोरे, दत्तात्रय सकपाळ, पांडुरंग कदम व युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते.

युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी युवाशक्तीची पुढील वाटचाल कशी असेल आणि अजून युवाशक्तीला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल. याबाबत मत व्यक्त केले. त्याचबरोबर कोकणातील पिंपरी चिंचवड पुणे स्थायिक असलेले युवा तरुण पिढीला युवाशक्तीत सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप सकपाळ यांनी केले तर आभार सूरज उत्तेकर यांनी मानले.