शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजियोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचं निदान झालं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. “काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही चाचण्या झाल्या होत्या. तपासण्यांमधून त्यांच्या प्रकृतीत काही बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीत त्यांना ठेवलं जाणार आहे.

खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपला जेरीस आणले होते. शिवसेनेची भूमिका मांडण्याचे जबाबदारी पूर्णपणे संजय राऊत यांच्यावर होती. गेल्या पंधरा दिवसांत दगदग झाल्यामुळे राऊत यांची प्रकृती बिघडली आहे.