क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर

क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा - विशाल वाळुंजकर 

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू व वर्ग संख्या वाढविण्याची मागणी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्तांना याबाबत वाळुंजकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार स्मार्ट शहर ओळखले जाते. शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडवण्याच्या दृष्टिकोनातून व प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधनी विद्यालय स्थापन करण्यात आले. पण, मनपाच्या माध्यमातून असणारे क्रीडा प्रबोधिनी विद्यालयमध्ये मराठी मिडीयममध्ये शिकवले जात असून यामुळे शहरातील खेळाडू विद्यार्थी यांच्या पाल्यांचा इंग्लिश मीडियममध्ये शिकण्याचा कल जास्त प्रमाण असते. यामुळे अनेक खेळाडू विद्यार्थी यांची इच्छा असून देखील क्रीडा प्रबोधनी कडे येऊ शकत नाहीत. शहरातील खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने पाचवी ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश चालू करावे व वर्ग संख्या ही एक असून ती प्रत्येक दोन करण्यात यावी. असे वाळुंजकर यांनी निवेदनात म्हटले आहे.