Tag: Chinchwad

शिवतेजनगर येथे मोफत शारीरिक तपासणी व व्यायाम शिबीराचे उदघाटन
पिंपरी चिंचवड

शिवतेजनगर येथे मोफत शारीरिक तपासणी व व्यायाम शिबीराचे उदघाटन

लोकमराठी : शिवतेजनगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व भाग्यश्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत मोफत शारीरिक तपासणी व व्यायामवय वर्ष 50 पुढील नागरिकांना सतावणारे, मानदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे, टोल जाणे, इत्यादि शारीरिक व्याधीवर वेग वेगळ्या प्रकारचे व्यायाम करून घेण्यात येतील. सोमवारी या शिबिराचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, भाग्यश्री चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ. स्वाती भिसे, ज्येष्ठ नागरिक संघांचे खजिनदार प्रकाश शिंदे, स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तोंडकर, अंजली देव, अक्षदा देशपांडे, गाडे मावशी, पवार बाबा, श्रारण अवसेकर, इत्यादी उपस्थित होते. सारिका रिकामे यांनी सूत्रसंचालन केले....
डिलक्स चौकात रस्ता दुभाजक बसविण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

डिलक्स चौकात रस्ता दुभाजक बसविण्याची मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : डिलक्स चौकात रस्ता दुभाजक नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच अनेकदा येथे छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या ठिकाणी रस्ता दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी अपना वतन संघटनेचे शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'ग' क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की डिलक्स चौकात काळेवाडी, रहाटणी, पिंपरीगाव येथून पिंपरी आंबेडकर चौक, भाटनगर, मोरवाडीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीचा मार्गक्रम आहे. पिंपरी मार्केट जवळच असल्यामुळे येथे कायमच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, डिलक्स सिनेमागृहासमोर रस्ता दुभाजक नसल्याने वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने चालवतात. त्यामुळे कायमच कोंडी होत असते. तसेच येथील अंजली मेडीकल व दवाखान्यासमोर रस्त्याच्या मधोमध पथदिव्याचा खांब असून त्याला जोडूनच रस्तादुभाजक कराची चौक...
70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी
पुणे

70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी

पुणे-हिंजवडी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते. हिंजवडी नजीकच्या माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये "लोड' केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात. दिवसाला सुमारे तीन ते दहा...
काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट

पिंपरी चिंचवड, (लोकमराठी) : काळेवाडी येथे भर रस्त्यात कारने पेट घेतला. काळेवाडीकडून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डी मार्टजवळ आज, रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीकडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. काही नागरिकांनी पाणी टाकुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने आणखीनच वाढली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनतर आग आटोक्यात आली. दरम्यान, यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती....