Tag: Hadapsar

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते....
एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे प्राचार्यपदी डॉ. एन. एस. गायकवाड
पुणे

एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे प्राचार्यपदी डॉ. एन. एस. गायकवाड

पुणे (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, पुणे येथे डॉ. एन. एस. गायकवाड प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. ते रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, तसेच ‘रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ साताराचे ते संचालकही होते. ते रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आहेत. भारतीय भौतिकशास्त्र संघटनेचे ते आजीवन सदस्य आहेत. संशोधनासाठी युरोपियन युनियनची पोस्ट डॉक्टरेटसाठी फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती. त्याआधारे त्यांनी ‘नॕशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च बेल्व्हू पॕरिस’ येथे सव्वा वर्ष संशोधन केले आहे. त्यांनी महाविद्यालयासाठी ‘गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ स्थापन केली. ज्यामध्ये वैयक्तिक शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. नॕक (NAAC) ...
एस. एम. जोशी कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांची सदिच्छा भेट
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांची सदिच्छा भेट

हडपसर, ता. २८ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी या नामांकित कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. एस. एम. जोशी कॉलेजमधील शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी याच कॉलेजमधील मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत कर्नल अंकुर सोरेक, लेफ्टनंट धीरज भीमवाल, आय.क़्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. किशोर काकडे, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे हे उपस्थित होते....
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर, ता. २८ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी नामांकित कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी मंडळ विभागामार्फत विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. इतिहास विभागामार्फत 'इन्कलाब' हा माहितीपट दाखविण्यात आला. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 'विभाजन विभिषीका स्मृतिदिनानिमित्त' इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या अमृत म...
रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी :“युद्धे, महायुद्धे, घात-अपघात, कोरोना, विविध आजारपणे आणि कितीतरी घटना, दुर्घटना जगाच्या पाठीवर नित्य घडत असतात. त्यावेळी लक्षावधी रुग्णांची सेवासुश्रुषा करावी लागते. त्यावेळी महत्त्वाची गरज भासते ती रक्ताची. रक्ताचा तुटवडा असेल तर वेळ प्रसंगी प्राणही जाऊ शकतो म्हणून पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती रक्तदानाची. रक्तदान हा आजच्या काळातील महायज्ञ आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.” असे विचार प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी या शिबिराचे उद्घाटन करताना वरील विचार मांडले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना व N.C.C. व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्या...
मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे – डॉ. शिवलिंग मेनकुदळे
शैक्षणिक

मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे – डॉ. शिवलिंग मेनकुदळे

हडपसर (प्रतिनिधी) : मराठी भाषेला लोकसंस्कृती व लोक व्यवहाराचे कवच आहे, तोपर्यंत कोणताही धोका नाही. मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे. ती लोक व्यवहाराबरोबर साहित्य व्यवहारातही असावी. कुसुमाग्रजांचे व्यक्तिमत्व प्रतिभासंपन्न होते. त्यांच्या साहित्यातील वैचारिकता समाजाला दिशा देणारी आहे. भाषा हा मानवी जगण्याचा श्वास आहे. त्यामुळेच आपल्या जीवनात गतिमानता आली आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. मराठी शाळा बंद पडत आहेत, ही धोक्याची सूचना आहे. इतर भाषा शिकूया पण आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे. लेखकांनी लेखन करून मराठी भाषा समृद्ध केली आहे. आपणही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करुया, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन समारंभ प्रसंगी प्...
समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. विश्वास देशमुख
पुणे, शैक्षणिक

समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. विश्वास देशमुख

हडपसर (प्रतिनिधी) : आजच्या काळातही छत्रपती शिवरायांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. शिवरायांनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. रयतेच्या सुखासाठी त्यांनी त्याग केला. शिवरायांचा आदर्श आचरणातून दिसावा, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिवजयंती समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे डॉ. विश्वास देशमुख यांनीही मोलाचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की ,समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे शिवराय होय. त्यागातूनच स्वराज्याची निर्मिती शिवरायांनी केली. हे स्वराज्य रयतेचे आहे. रयतेच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याचे समर्पण करणारे राजे रयतेचे झाले असे विचार डॉ.विश्वास देशमुख यांनी ओघवत्या शैलीत मांडले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संजय जगताप उपप्राचार्य प्रा. संजय जडे आय. क्यु. ए. सी. चे प्रमुख डॉ किशोर काकडे...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘निर्भय कन्या अभियान’ उपक्रम संपन्‍न
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘निर्भय कन्या अभियान’ उपक्रम संपन्‍न

हडपसर (प्रतिनिधी) : विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'निर्भय कन्या अभियान' या उपक्रमांतर्गत दोन व्याख्यानांचे व एक दिवसीय कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखा हडपसरच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे उपस्थित होत्या. त्यांनी 'महिला संरक्षण, कायदे व नियम' या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कायद्याने आपल्याला संरक्षण दिले आहे. त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा. नवीन गोष्टी शिकत राहा. उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. अशा स्वरूपाचा संदेश पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी दिला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, येथील कॉमर्स विभागातील प्रा. असावरी शेवाळे मॅडम यांनी 'व्यावसायिक उद्यो...
वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणून अंधश्रद्धेला जीवनात स्थान देऊ नये | एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांचे प्रतिपादन
पुणे

वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणून अंधश्रद्धेला जीवनात स्थान देऊ नये | एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांचे प्रतिपादन

हडपसर (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करा. प्रदूषणमुक्त विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी विज्ञानाच्या प्राध्यापकानी प्रयत्न करावेत. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आचरणात आणावा. अंधश्रद्धेला आपल्या जीवनात स्थान देऊ नये. विज्ञानाच्या क्षेत्रात शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे आपण कष्ट समजून घेतले पाहिजेत. काळानुरूप बदलणार्‍या संशोधन पद्धती आपण समजून घेतल्या तरच भविष्यातील संशोधनाची वाटचाल सुकर होईल, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्टुडेंट टीचर असोसिएशन्स सेल व सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी केमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. गजानन...
प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान
यशोगाथा, शैक्षणिक

प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान

हडपसर : एस. एम. जोशी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. सुरेश दगडू भोसले यांना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. ची पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ''अ स्टडी ऑफ सल्स टाइपोलॉजी विथ रेफरन्स टू द सेलेक्टेड नॉव्हेल्स ऑफ अरविंद अडीगा खलीद हुसेनी श्याम सेलवादुराई'' या विषयात संशोधन केले आहे. त्यांना डॉ. सुधीर मठपती यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यू. ए.सी.चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शहाजी करंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले....