Tag: Journalist Rohit Athavale

ब्लॅक गोल्डप्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड | स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने
मोठी बातमी, विशेष लेख

ब्लॅक गोल्डप्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड | स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने

रोहित आठवले उद्योगनगरीत मागणी वाढत गेल्यावर ऑइलचा काळाबाजार आणि त्यातून घर भरणारे पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले. आता ब्लॅक ऑईलचा ट्रेण्ड मागे पडून गार्बेज गोल्डने जोर धरला असून, शहरातील या कचऱ्यावर आपल्या घरात हिरवळ फुलविणारे बहरू लागले आहेत. पिंपरी चिंचवडमधील कारखान्यांना पूर्वी ऑईलची गरज भासत होती. त्यातून या ऑईलचा काळाबाजार सुरू झाला. ब्लॅक गोल्ड म्हणून याकडे पाहिले जाऊ लागल्याने अनेकांनी यावर घरं भरली. पण नंतर तंत्रज्ञानात बदल होत जाऊन ही मागणी रोडावली. त्यामुळे याचा काळाबाजारही कमी झाला. पण शहरातील वाढती लोकसंख्या व नोकरीसाठी दाखल झालेल्यांच्या घरात कंपन्यांत तयार होणाऱ्या कचऱ्याला नेते मंडळींनी आपलंस करायला सुरुवात केली. कचरा कोण उचलणार, तो नेऊन कोण टाकणार, त्यातून भंगार कोण वेगळे करणार, वेगळे केलेले भंगार डेपोतून बाहेर कोण आणणार, पुढे ते जालना आणि मुंबईला को...
पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरीत ; पिंपरी चिंचवडचे असेही कनेक्शन
मोठी बातमी, विशेष लेख

पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरीत ; पिंपरी चिंचवडचे असेही कनेक्शन

रोहित आठवले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधातील १२५ तासांच्या कथित रेकॉर्डिंग पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरी चिंचवडहून (Pimpri Chinchwad) पेटल्याचे आता समोर येत आहे. ज्या गुन्ह्यात संबंधित आरोपीचे वकीलपत्र घेण्यात आले. तो गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. तर तपासात २०२१ मध्ये आरोपींच्या अटकेनंतर जामिनासाठी संबंधित वकिलाला आरोपींच्या कुटुंबाने भेटून वकीलपत्र दिले होते. या कथित प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण (Adv Pravin Chavan) यांचे रेकॉर्डिंग असलेल्याचे सांगणारा पेनड्राईव्ह नुकताच विधानमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सादर झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. हे मोडतोड (मॅन्यूप्लेटेड) केलेले...
लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा | भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर
विशेष लेख

लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा | भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर

रोहित आठवले फेसबुक-इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी करणारी दोन प्रकरण नुकतीच पुढे आली. तर याच माध्यमातून कॉलेजिअन्संना रस्त्यावर उतरविणारा भाऊही नावाजला गेला. परंतु, या सगळ्यांच्या पोस्टला होणारा लाईक अँड शेअरचा दररोजचा आर्थिक डोलारा हा काही लाखात असून, या माध्यमावर सुरू असलेले भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्नकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्थानिक #पोलिस, राज्य पोलिस, #एटीएस, #नर्कोटिक कंट्रोल ब्यूरो यासह देशातील विविध तपास आणि गुप्तचर यंत्रणांची स्वतंत्रपणे सोशल मीडियाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी टीम असते. पण यातील एकाही यंत्रणेला महाराष्ट्रात एकाच वेळेस विविध ठिकाणी कॉलेजिअन्स् रस्त्यावर उतरणार असल्याचे समजले नव्हते. तसेच सोशल मीडियावरून पर्सनल ॲप्लीकेशन डाउनलोड करायला सांगून त्याद्वारे सुरू असलेला सॉफ्ट पॉर्नचा धंदा आणि त्यातून चालणारी आर्थिक उलाढाल ...
अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात |कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये
मोठी बातमी, विशेष लेख

अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात |कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये

रोहित आठवले युवकाचा अपघात होतो.. शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले गेल्याने पोटच्या गोळ्याला पुन्हा उभे करण्यासाठी आईची धडपड सुरू होते. परंतु, आपल्या जखमी मुलाला ओरबडण्यास "वायसीएम"ची श्वापदसज्ज असल्याचे पाहून ती माऊली पुरती हादरून जाते. डॉक्टरांनी सांगितलेली सामुग्री ठराविक कंपनी (ठेकेदार) कडून खरेदी केली नसल्याने तुमच्या मुलाची शस्त्रक्रिया अयशस्वी होईल अशी भीती दाखवून वस्तूरुपी (इंप्लांट) खंडणी उकळली जाते. मात्र, जुनी प्रकरण उकरून गुन्हे दाखल करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना या घटनेची महिन्यानंतर साधी कल्पना सुद्धा नाही. शहरात गेल्या महिन्याभरात हा सगळा घटनाक्रम घडला आहे. परंतु, आपल्या मुलाबाळांना निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून धडपडणाऱ्या स्थानिक धेंडांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास वेळ झालेला नाही. तर दुसरीकडे दर शुक्रवारी पुण्यात जाऊन दादांच्या पाया...
सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती
मोठी बातमी, विशेष लेख

सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती

रोहित आठवले घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरून अपहरण झालेला मुलगा पूनावळे येथे बांधकाम साईट वर सोडून देण्यात आला. पिंपरी चिंचवडकरांनी अंडरवर्ल्डचा अपहरणाशी संबंध ते अनेक प्रकरणात कोर्टात कुटुंबाने साक्षी फिरवण्याच्या घटना पाहिल्या आहेत. डूग्गुला पूनावळेमध्ये कोणी सोडले. या प्रकरणात जवळच्या कोणाचा सहभाग आहे का हे पोलिसांच्या तपासातून पुढे येईल. पण तो पर्यंत सोशल मीडियावर झालेला अतातायीपणा कसा घडला आणि आरोपी कुठे कुठे फिरला ते वाचूयात... डूग्गुच्या जीवावर बेतणारे आणि पोलिसांना तपासात व्यत्यय येईल असे अँटी सोशल काम सोशल मीडियाद्वारे अनेकांनी मागील काही दिवसात केले आहे. पत्रकारांना बातमीची कायमच जीवघेणी स्पर्धा असतानाही एकानेही ब्रेकिंग अथवा तपास कसा सुरू आहे, तपास का थंडावला, तपासात कुठे कोण चुकले या बातम्या केल्या नाहीत. याला दोन तीन अपवादही ...
हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं ‘एसीपी आर. आर. पाटील’
विशेष लेख

हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं ‘एसीपी आर. आर. पाटील’

रोहित आठवले वलयांकित असूनही लोप्रोफाईल आयुष्य जगलेले, स्वता:ला हायप्रोफाइल न समजणारे, हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे असे पोलिस अधिकारी म्हणजे तात्या.. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील.. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सख्खे बंधू असणारे तात्या म्हणजेच राजाराम रामराव पाटील हेही आर. आर. पाटील; पण तात्या म्हणून राज्यभर परिचित आहेत. पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तात्या आज निवृत्त होत आहेत. पोलिस खात्यात भरती होणारे आणि वयपरत्त्वे निवृत्त होणारे अधिकारी मी खूप पाहिले. मात्र, १२ वर्ष गृहमंत्री तसेच काहीकाळ उपमुख्यमंत्री असणाऱ्या आबांचा सख्खा भाऊ असूनही तात्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात एक दोन नव्हे तर वीस वर्ष साईड पोस्टिंग केले. एकीकडे ग्रामपंचायत सदस्याचा किंवा आमदाराचा कार्यकर्ता नातेवाईक असल्यास आत्ताचे रिक्रूट (नवं भरती) पोलिस क्रीम पोस्टि...