Tag: Karjat Police

दोन किलो सोने चोरीतील आरोपी कर्जत व पुणे पोलिसांनी केले जेरबंद
महाराष्ट्र, मोठी बातमी

दोन किलो सोने चोरीतील आरोपी कर्जत व पुणे पोलिसांनी केले जेरबंद

कर्जत (प्रतिनिधी) : दोन किलो सोने चोरीतील आरोपी कर्जत आणि पुणे पोलिसांकडून संयुक्त कारवाईत जेरबंद करण्यात आले असून त्यांचेकडून एक किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. मारुती राजाराम पिटेकर (वय ४५ वर्षे, रा. माळंगी, ता. कर्जत) व आनंता लक्ष्मण धांडे (वय ४० वर्षे, रा. वालवड, ता.कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे राजगड पोलीस ठाणे व पुणे ग्रामीण हद्दितुन २० ऑक्टोबर रोजी रात्री प्रवास करत होते. त्यावेळी कोल्हापूर ते खेड शिवापूर टोल नाका दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली ८१ लाख २४ हजार किमतीचे २११० ग्रॅम वजनाचे १८ कॅरेटचे सोन्याचे वेगवेगळे दागिने १८ लाख रोख रक्कम असे एकूण ९९ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज असलेली बॅग चोरी केली. याबाबत राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे फिर्याद दाखल करण्यात आली....
महीला-मुलींनो कुणी त्रास देत असेल तर निर्भयपणे पुढे या! पोलिस तुमच्या पाठीशी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल!
महाराष्ट्र, मोठी बातमी

महीला-मुलींनो कुणी त्रास देत असेल तर निर्भयपणे पुढे या! पोलिस तुमच्या पाठीशी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल!

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन कर्जत : 'महिला-मुलींनो तुम्हाला जर कुणी ज्ञात-अज्ञात त्रास देत असेल तर मनात कोणतीही भीती न बाळगता बिनधास्तपणे पुढे या.कर्जतच्या पोलीस ठाण्यात किंवा तुम्हाला शक्य असेल त्या दुरक्षेत्रात तक्रार द्या.तुमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करून होणाऱ्या त्रासापासून तुमची कायमची सुटका केली जाईल' असे आवाहन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. महिला-मुलींच्या सुरक्षीततेसाठी व त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी कर्जत पोलिसांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील अनेक शाळा-महाविद्यालयात जाऊन हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधला आहे. पोलीसांनी सुरू केलेल्या 'भरोसा सेल' तसेच अनेक उपाययोजनांची माहिती त्यांना पटवून दिली आहे.&nb...
गोठ्याची भिंत उचकटून चांदे खुर्दमध्ये शेळ्यांची चोरी | कर्जत तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच
महाराष्ट्र

गोठ्याची भिंत उचकटून चांदे खुर्दमध्ये शेळ्यांची चोरी | कर्जत तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच

अहमदनगर : गोठ्याची भिंत फोडून चोरट्यांनी एक शेळी व दोन करडे लंपास केले. ही घटना सोमवारी (ता. १६) रात्री चांदे खुर्द (ता. कर्जत) येथील भोसले वस्ती येथे घडली. किशोर भोसले असे शेळी मालकाचे नाव आहे. भोसले यांच्या घराशेजारीच गोठा असून त्यामध्ये ते जनावरे ठेवत असतात. शेळी व करडांसह इतर जनावरे घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधून भोसले घरामध्ये झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी गोठ्याच्या पाठीमागील दगडी भिंत अलगत उचकटून शेळी व दोन करडे चोरून नेले. भोसले यांना सकाळी ही बाब लक्षात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी मुळेवाडी येथे तीन शेळ्यांची तर योगेश मुळे यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. कर्जत तालुक्यात चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठ...
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र, मोठी बातमी

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन

अहमदनगर : पत्नीला आत्महत्येसह प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैन्यदलातील सैनिकाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांनी कर्जत येथील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (ता. २) धरणे आंदोलन केले. प्रदिप अनिल शिंदे (रा. पाटेगाव) असे अटक केलेल्या सैनिकांचे नाव आहे. तर स्नेहा प्रदिप शिंदे असे मृत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरला स्नेहा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रदिप यांना समजताच ते कर्तव्यावर असलेल्या ठिकाणांहून कमांडींग ऑफिसरच्या सूचनेनुसार थेट कर्जत पोलिस ठाण्यात हजर झाले. तेथून ते पोलिसांसह पत्नीच्या अंत्यविधीसाठी गावी गेले. मात्र, स्नेहा यांच्या आईने प्रदिप यांच्यासह सासरची मंडळी व इतर नातेवाईकांविरोधात फिर्याद दिल्याने कर्जत पोलिसांनी प्रदिप यांना अटक केली. फिर्यादीत म्हटले आहे की, ...