Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४
पुणे (लोकमराठी): पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रत्येक दिवसाला नवा आकडा नोंदवून तो वाढला जातोय. आज हा 204 वप पोहचला आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. काल पुण्यात एकाच दिवशी 8 जणांना कोरोनाने आपले प्राण गमवावे लागले.
पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या आजपर्यंत(गुरूवार दुपार) नोंदवली गेली आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान, पुण्यात रूग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे.
कामाविना फिरणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे. तर अत्यावश्यक गरजांसाठी बाहेर पडणाऱ्या सगळ्यांना आता मास्क लावणं बंधनकारक आहे....