Tag: Marathi News

काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : प्रभाग क्रमांक २२ मधील विजय नगर भागात अनेक विद्युत डीपी बॉक्स रस्त्यांमध्ये बसविलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकदा अपघातही झाले आहेत. असे रहदारीला त्रासदायक ठरणारे डीपी बॉक्स रस्त्यांच्या बाजूला बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुलराहिम यांनी केली आहे. महावितरणच्या वतीने बसविला जाणारे विद्युत डब्बे रस्त्याच्या कडेला बसविणे अवश्यक होते. परंतु, ते साधारण तीन फूट रस्त्यांमध्ये बसविले आहेत. या ठिकाणी राहणार्‍या करदात्यांना असे नियम बाह्य बसविलेल्या डब्यांमुळे अडचण होत आहे. वाहन चालवताना वळणावर जपून चालवावे लागते, कारण या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. मागील पाच वर्षात कोणीही या प्रकरणात लक्ष घातले नाही. असे शेख यांनी सांगितले. https://www.amazon.in/gp/product/B00F38B3NW/ref=as_li_...
महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित
पिंपरी चिंचवड

महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित

पिंपरी चिंचवड : शहरामध्ये १ जुलैपासून लादलेल्या पे अँड पार्किंग धोरणाला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या धोरणामुळे सामान्य जनतेची व कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना निवेदन दिले होते. परंतु आज आठवडा उलटून देखील पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत हे धोरण कुणाच्या हितासाठी रेटून नेण्यात येत आहे? असा सवाल करीत आज शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ रोजी महापौर कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु महापौर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत अपना वतन संघटनेच्या वतीने पे अँड पार्क धोरण रद्द करून स...
महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेत रक्तदान करून ईद साजरी
महाराष्ट्र

महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेत रक्तदान करून ईद साजरी

लातूर : शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूरच्या वतीने "ईद उल अजहा" निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ईद हा सण कुर्बानी देऊन साजरा न करता आपण रक्तदान करून ईद साजरी करावी असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी महिला विभागाच्या राज्य सह कार्यवाह रुकसना मुल्ला, मिश्र विवाह विभाग कार्यवाह रणजित आचार्य, देवराज लंगोटे यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी राज्य प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, अरमान सय्यद, माऊली ब्लड बँकेचे यावस्थापक डॉ सितम सोनवणे, स्टाफ शिवानी गायकवाड , श्रीता गायकवाड यांची सदरील उपक्रमात उपस्थिती होती....
बकरी ईद निमित्त अंनिस कोल्हापूर व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न
महाराष्ट्र, सामाजिक

बकरी ईद निमित्त अंनिस कोल्हापूर व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही इच्छा, ध्येय सिद्ध करण्यासाठी "कुर्बानी" किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. हा त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून "ईद - उल - अजहा" (बकरी ईद) हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. यानिमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी आपले सण अधिकाधिक समाजाभिमुख आणि मानवतावादी करणे हेच धर्माचे उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यावतीने बकरी ईद निमित्त पशुची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये काळानुरूप बदल व्हावा व या प्रथेल...
मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान

पिंपरी : कोविड १९ महामारीत अत्यावशक सेवेमध्ये आपली सर्वोतपरी जबाबदारी पार पडून सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास कर्तव्यदक्ष राहणारे पोलीस बांधव व वैद्यकिय सेवेतील डॉक्टर यांचा मनसे युवानेते प्रविण माळी आणि अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रावेत पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र राजमाने यांना तसेच मंगलमुर्ती हॉस्पिटल, स्नेह हेल्थ केअर, पँथलॉजी लँब, अशा अनेक ठिकाणी कोविड योध्दा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी फाऊंडेशनचे सदस्य गणेश माळी, माऊली गव्हाडे, चैतन्य शिंगटे,अनिकेत साळुंखे आदि उपस्थित होते....
एसटी महामंडळाचा भोसरीतील ‘ट्रायल ट्रॅक’ अखेर सुरू करणार : रमाकांत गायकवाड
पिंपरी चिंचवड

एसटी महामंडळाचा भोसरीतील ‘ट्रायल ट्रॅक’ अखेर सुरू करणार : रमाकांत गायकवाड

भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा भरती प्रक्रियेत सहभागी सुमारे ३ हजार चालक, वाहकांना मिळणार दिलासा पिंपरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागीय प्रशासनाचा भोसरी येथील वाहन चालक व वाहक ‘ट्रायल ट्रॅक’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच, येत्या २ ऑगस्टपासून महिला प्रशिक्षणही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायवाड यांनी दिली. त्यामुळे भरती प्रक्रियेतील सुमारे ३ हजार चालक व वाहकांना दिलासा मिळणार आहे. कोरोना, लॉकडाउन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुणे विभागातील ही भरती प्रक्रिया रखडली होती. याबाबत संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पिंपरी-चिंचवड भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची भेट घेतली. पुणे विभागातील दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी असलेली ही भरती प्रक्रिया राबवण्याब...
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मोठी बातमी, शैक्षणिक

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या म...
महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह

रायगड : भोर-महाड या रस्त्यावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रायगड किंवा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून ३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या चिटफंड चालकासी मिळते जुळते वर्णन असल्याने नातेवाईक महाडला रवाना झाले असल्याचे कळते आहे. ...
Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
शैक्षणिक

Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

मोशी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श नगर मोशी या शाळेमध्ये कोविंड 19 शासकीय मार्गदर्शक सूचनेचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ध्वजारोहण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते झाले आपल्या प्रस्ताविकामध्ये भारतामधील स्वातंत्र्य, समता, बंधुता जाणीव करून दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते व संस्थेचे सचिव डॉक्टर तुषार देवकाते, शिक्षक वृंदाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ...
जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार
मोठी बातमी, महाराष्ट्र

जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार

यवतमाळ : ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ...