जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार
यवतमाळ : ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ...










