Tag: Marathi News

निगडीतील विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र सुरु
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

निगडीतील विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र सुरु

निगडी : विशेष विद्यार्थ्यांसाठी (मानसिक अपंग) ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे शाळा सरकारी निधीतून आणि एनजीओ द्वारे चालवली जाते. येथे हेंकेलचे अध्यक्ष सुनील कुमार यांच्या हस्ते कौशल्य विकास शाळेचे ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे सिएसआर प्रकल्प म्हणून उद्घाटन केले. यावेळी सीएसआर समिती सदस्य भूपेश सिंग, सौ.संध्या केडलया, सौ.कुंजल पारेख, मॅनेजर सचिन सपार, पी.के. वर्मा, शाळेतील शिक्षक, हेंकेल कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मुळात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांना सरकार मदत करत असते पण 18 वर्षानंतर विद्यार्थी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. यासाठी आता शाळेत कौशल्य विकासाचे छोटे उपक्रम सुरू केले आहेत ज्यात हे विद्यार्थी समाजाला विविध सेवा देतील आणि बनवलेल्या वस्तूंची विक्री करतील. हेंकेल अध्यक्षांनी केलेल्या मशिनरींचे उद्घाटन केले, ज्यामध्ये फ्लोरिंग मिल, कापूर मश...
नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम
खवय्ये

नागपूरच्या किट्टुबिटुब्लॉगर्सनी फूड ब्लॉगिंगमध्ये रचला विश्वविक्रम

नागपुर (लोकमराठी न्यूज) : किट्टूबिट्टूवीलॉगर्स (kittubittuvloggers) ला अलीकडेच "इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड्स" ने भारतातील सर्वात तरुण फूड व्लॉगर्स म्हणून सन्मानित केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. किट्टूबिट्टूवीलॉगर्स ना देखील अलीकडेच 94.3 MYFM रेडिओ चॅनलवर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेथे त्यांनी वाहतूक नियंत्रण नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एका मोठ्या उपक्रमात भाग घेतला होता. "तुम्ही तरुण आणि प्रतिभावान असाल, तर तुम्हाला पंख असल्यासारखे वाटते" असे म्हणतात. आशिष आणि श्रीमती भावना यांच्या पोटी जन्मलेल्या नक्ष (८ वर्षे) आणि सिद्धार्थ धिंग (६ वर्षे) या दोन मास्टरमाइंड भाऊंच्या कामातही हेच सिद्ध झाले आहे. किट्टूबिट्टूवीलॉगर्स हे देशातील सर्वात तरुण व्यावसायिक व्लॉगर्स आहेत. ज्यांनी विविध खाद्य...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध – वेदांग महाजन
राजकारण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध – वेदांग महाजन

पुणे (लोकमराठी न्यूज) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर बेताल वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंग आहे. अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. असे प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी यापुढे अशी बेताल वक्तव्य केल्यास मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हालगी आंदोलन कलाकारांना सोबत घेऊन केले जाईल. असा इशारा इशाराही वेदांग महाजन यांनी दिला‌ आहे. ...
कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे 
पुणे

कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे

पुणे (लोकमराठी न्यूज) : कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे या संस्थेची महाराष्ट्र नवनिर्वाचित कार्यकारणी २०२३-२०२४ नुकतीच जाहीर करण्यात आली. रुपेश मोरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्ती कार्यकारिणीचा सत्कार पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मेत्रे वस्ती (चिखली) येथे करण्यात आला. उपाध्यक्षपदी संदीप जाधव व मंगेश घाग, सचिवपदी प्रा. संदीप सकपाळ, सहसचिवपदी समीर चव्हाण, कार्याध्यक्षपदी संतोष कदम व राहुल ढेबे, खजिनदारपदी नंदकुमार महाडिक व महेश गोरे तसेच उत्सव कमिटी अध्यक्षपदी कैलास मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी अठरा गाव मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम कॅप्टन श्रीपत कदम, गजानन मोरे, दत्तात्रय सकपाळ, पांडुरंग कदम व युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते. युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी युवाशक्तीची पुढील वाटचाल...
Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ; दिल्ली बुडाली
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ; दिल्ली बुडाली

नवी दिल्ली : दिल्लीतील यमुना नदीचे पाणी सतत विकराल रूप धारण करित आहे. 46 वर्षांचा विक्रम मोडत पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. राजधानीतील सर्व सखल भाग पाण्यात बुडाला आहे. कश्मीरी गेट आयएसबीटीमध्ये अनेक फूट पाणी आहे. नेहमी गजबजणारा रिंगरोड सुनसान आहे. रिंगरोडवर यमुना नदीच्या पाण्यात उसळणाऱ्या लाटा आपल्याला समुद्राची आठवण करून देत आहेत. राजघाटापासून चांदगी राम आखाड्यापर्यंत ते पाण्यात बुडाले आहेत. दिल्लीतील सर्वात मोठे स्मशान बोधघाट बंद करण्यात आले आहे. त्यात अनेक फूट पाणी साचले आहे. https://youtu.be/lLG_PRuuFgw केंद्रीय जल आयोगानुसार हरियाणा बॅरेजमधून येणाऱ्या पाण्याची पातळी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे. दिल्लीचा लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय. दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीमुळे यमुनेच्या आसपासच्या भागातील शाळा रविवारपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्...
भोसरीतील गवंड्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; झोपडीत राहणार्‍या नीलेश बचुटेची यशाला गवसणी
यशोगाथा

भोसरीतील गवंड्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; झोपडीत राहणार्‍या नीलेश बचुटेची यशाला गवसणी

पोलीस उपनिरीक्षक बनून नीलेश बचुटेने फेडले कष्टकरी मायबापाचे ऋण पिंपरी : पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठरा विश्वं दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, वडिल गवंडी, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण; मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिलांनी गवंडी काम करत चार पैसेगाठीला बांधून नीलेशला चांगलं शिक्षण दिले आणि त्याचे चीज करीत अखेर नीलेशनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या 4 जुलैच्या निकालात उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि गवंड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सर्व नातेवाईक गहिवरून गेले. काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही, हे नीलेशने सिध्द करून दाखविले आहे. क...
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या दहावी व बारावी उत्तीर्ण नातवांचा गौरव सभारंभ उत्साहात 
सिटिझन जर्नालिस्ट

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या दहावी व बारावी उत्तीर्ण नातवांचा गौरव सभारंभ उत्साहात

पिपरी : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाच्या सभासदांच्या १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सभारंभ संघाच्या विरंगुळा केंद्र सभागृहात आयोजित केला होता. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. प्रा. हभप हेमलता सोळवंडे होत्या. त्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक, रोख बक्षीस, भेट वस्तू व मिठाई देवुन ३० विद्यार्थींचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी योग गुरू बाबा सुरेश विटकर यांचा सत्कार संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर डॉ. प्रा. हेमलता सोळवंडे यांचा सत्कार संघाच्या महिला उपाध्यक्ष सुरेखा नखाते यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे हे होते. या प्रसंगी संघाचे सल्लागार पोपटराव माने व शालन माने यांचा वाढदिवसा निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्यावेळी संघ...
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात २५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे व संस्थापक संजय भिसे, विठाई वाचनालयाचे सभासद विलास जोशी, देवराव वैद्य, श्रीकृष्ण नीलेगवकर, रमेश वाणी, सुभाषचंद्र पवार, दिलीप चौघुले आदी उपस्थित होते. याबाबत उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या की, " सजीवांचे रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांनाच पर्यावरणाचे संवर्धन व संतुलन राखणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वतःपासून थोडे तरी प्रयत्न करू शकतो. सध्या प्लास्टिक हा पर्यावरणास हाणी पोहोचवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. त्या अनुषंगाने उन्नती सोशल फाउंडेश...
‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी, शैक्षणिक

‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : गरीब कुटुंबातील मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण मिळावे या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) मूळ उद्देशाला धाब्यावर बसवण्याचा प्रकार चिंचवड येथील शाळेत घडला आहे. चिंचवड येथील एका नामांकित अशा इंटरनॅशनल स्कूल या शाळेत 'आरटीई' मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग करून त्यांना शाळेच्या मुख्य इमारातीपासून दूर वेगळ्या ठिकाणी त्यांना शिकवले जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नायकवडी यांच्याकडे ही तक्रार केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील या शाळेत उच्चभ्रू वर्गातील मुले शिकतात 'आरटीई' च्या नियमानुसार शाळेला 25% प्रवेश गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे, शाळेने ही प्रक्रिया पूर्ण केली; पण शाळा सुरू झाल्...
बीडकर हिंदु- मुस्लिम एकात्म्याचे दर्शन; बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी यांचा ईदच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणीची मुर्ती देऊन केला सन्मान
पिंपरी चिंचवड

बीडकर हिंदु- मुस्लिम एकात्म्याचे दर्शन; बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी यांचा ईदच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणीची मुर्ती देऊन केला सन्मान

पिंपरी, दि.२ (लोकमराठी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री भारत सरकार खासदार. रामदासजी आठवले यांचे कट्टर समर्थक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतुक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद या दोन्ही दोन समाजाच्या वतीने महत्वाचे समजले जाणारे सण याचे महत्व लक्षात घेत आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा पि.चि.महानगर पालिकेतील पुर्वाश्रमिचा जनते प्रति घेतलेल्या निर्णयाचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले याच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांचा हिंदु-मुस्लीम ऐक्याचे पाइक म्हनुन शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानाला ऊत्तर देत अजित पवार बोलताना अजिज शेख हे मुस्लिम समाजाचे असुन ही मला पांडुरंगाचे प्रतिरुप विठ्ठल रखुमानी या...