शहरातील असंख्य खड्ड्यांमध्ये दडले मोठे अर्थकारण ; शहरातील खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे – आप
जाणीव पुर्वक निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे रस्त्यावर खड्डे- आपचा आरोप
लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार यांची रोजगार हमी योजना आहे काय? आपचा सवाल
रिजेक्शन चार्जेस लावून मोफत दुरुस्ती करून घ्यावी : चेतन बेंद्रे
पिंपरी चिंचवड : महापालिकेचा बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते बांधतो. या रस्त्यांचे बांधकाम नेहमीप्रमाणे निकृष्ट दर्जाचेच केले जाते. रस्ते विकास ही अहोरात्र सुरू असणारी रोजगार योजना लोकप्रतिनिधी, अधिकारी, आणि ठेकेदारयांनी राबवली आहे.
महापालिकेचे सुमारे ६००० कोटींचे बजेट आहे. त्यातील सुमारे १२०० ते १५०० कोटी रूपये फक्त स्थापत्य कामासाठी आहेत. स्मार्ट सिटीच्या नियोजनात करदात्यांना खड्डे मुक्त रस्ते मिळावेत अशी अपेक्षा असते. मुळात या शहरात किती रस्ते आहेत याचे हिस्ट्री कार्ड आता नागरिकांना मिळाले पाहिजे. २०१७ पासून शहरात उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरण, डांबरीकरण यासाठी अहो...










