उन्नती फाऊंडेशन ही सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ – अश्विनीताई लक्ष्मण जगताप
उन्नती सोशल फाउंडेशनच्या "बेस्ट दांडिया ग्रुप डान्स स्पर्धेची" पिंपळे सौदागरमध्ये धूम
युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग, स्पर्धकांवर बक्षिसांची बरसात
पिंपळे सौदागर, (प्रतिनिधी) : आपल्या सर्वांवर कोरोनाचे संकट आले तेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशनची (Unnati Social Foundation) टीम नागरिकांची काळजी घेण्यात व्यस्त होती. जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जीवाची परवा न करता उन्नतीच्या टीमने नागरिकांच्या दारात जाऊन अन्नपुरवठ्यापासून ते रुग्णालयात बेड उपलब्ध करेपर्यंत कष्ट घेतले. माझ्या प्रभागातील एकाही नागरिकाच्या जीवाला धोका होऊ नये, या आकांक्षेने उन्नती सोशल फाऊंडशन लढत राहिले. ते आपल्या कार्यात यशस्वी झाले असून त्यांच्यामुळेच आपल्याला आज दांडियाचा मनसोक्त आनंद घ्यायला मिळाला. त्यामुळे उन्नती हे केवळ फाऊंडेशन नसून ती सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ आहे, असा विश्वास अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त...