Tag: pcmc

कायदा सांगून लोकांना घाबरवू नका, ओला कचरा जिरवण्यासाठी महापालिकेचा निधी द्या; तोपर्यंत “तो” निर्णय बेमुदत स्थगित करा; आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना ठणकावले
पिंपरी चिंचवड

कायदा सांगून लोकांना घाबरवू नका, ओला कचरा जिरवण्यासाठी महापालिकेचा निधी द्या; तोपर्यंत “तो” निर्णय बेमुदत स्थगित करा; आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना ठणकावले

पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२२ : महापालिकेला सर्व प्रकारचा कर देणाऱ्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेने स्वतःचा निधी देऊन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी. तसेच २०१६ नंतरच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ओला कचरा विल्हेवाटीची यंत्रणा न उभारलेल्या बिल्डरांवर कारवाई करावी. उगाचच कायद्याचा धाक दाखवून गृहनिर्माण सोसायट्यांचा कचराच उचलणार नसल्याचे सांगत लाखो लोकांना घाबरवू नका. महापालिकेने वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे धोरण सोडून द्यावे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेमार्फत ओला कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारली जात नाही, तोपर्यंत प्रतिदिन १०० किलोहून अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याच्या आदेशाला बेमुदत स्थगि...
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड 
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड

पिंपरी, दि. ०१ ऑक्टोबर २०२२ : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषद ही समाजातील दुर्बल, अन्याय झालेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी संस्था आहे. त्याच्या पुणे जिल्हा ( पुणे व पिंपरी चिंचवड शहर ) अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. देविदास हरिश्चंद्र शेलार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. देविदास शेलार म्हणाले, "कि आमचा मुख्य उद्देश समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे, नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे , जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे, महिलांवरील अत्याचार थांबवन्यासाठी कार्य करणे, पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध, भ्रष्टाचाराला आळा घालणे, लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत (आम आदमीपर्यंत) पोहचवणे, समाजात प्रचलित अ...
पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव

पिंपळे सौदागर, ता. 30 : येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना रूग्ण संख्या विचारात घेता अपुरा पडत आहे. तोकड्या जागेमुळे कर्मचाऱ्यांसह रूग्णांचेही मोठे हाल होतात. त्यामुळे लवकरात लवकर या दवाखान्याचा विस्तार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे. याबाबत जाधव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ एक ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक उपचार घेण्यासाठी या दवाखान्यात येतात. दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडीची सेवा घेतात. संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच बालक लसीकरण मोहीमही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी, निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जातात. परिणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ह्याच...
ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन
पिंपरी चिंचवड

ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन

पिंपरी, ता. २७ सप्टेंबर २०२२ : ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांच्या श्रीमती मातोश्री इंदुबाई गणपत माने (वय ७२ वर्षे ) यांचे सोमवारी (ता. २६) रात्री निधन झाले. त्यांच्या मागे ॲड. सुनील माने आणि ॲड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती इंदुबाई माने यांच्या पार्थिवावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभुमी येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे
पिंपरी चिंचवड

आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे

पिंपरी : आकुर्डी प्राधिकरण येथील निवासी भागातील कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करावे. पिंपरी भाजी मंडई गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न, प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील नागरिकांच्या अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना आदी विषयांवर आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी केली. शुक्रवारी पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात आ. आण्णा बनसोडे यांनी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रसाद शेट्टी तसेच अनुप मोरे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश लांडगे, प्रतीक इंगळे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. आकुर्डी प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र ...
क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर 
पिंपरी चिंचवड

क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू व वर्ग संख्या वाढविण्याची मागणी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत वाळुंजकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार स्मार्ट शहर ओळखले जाते. शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडवण्याच्या दृष्टिकोनातून व प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधनी विद्यालय स्थापन करण्यात आले. पण, मनपाच्या माध्यमातून असणारे क्रीडा प्रबोधिनी विद्यालयमध्ये मराठी मिडीयममध्ये शिकवले जात असून यामुळे शहरातील खेळाडू विद्यार्थी यांच्या पाल्यांचा इंग्लिश मीडियममध्ये शिकण्याचा कल जास्त प्रमाण असते. यामुळे अनेक खेळाडू विद्यार्थी यांची इच्छा असून देखील क्रीडा प्रबोधनी कडे येऊ शकत नाहीत. शहरातील खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने ...
विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर
सामाजिक

विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर

पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर येथील स्वयंसेवक स्व. विजयराव गोविंदराव पाठक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर शाहूनगर येथे स्व विजयराव पाठक स्मृती मंच तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, गटाचे संघचालक नरेंद्र गुप्ता, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे, तसेच माजी नगरसेवक केशव घोळवे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, शिव शंभू प्रतिष्ठान अध्यक्ष संजय तोरखेदे व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर माने यांनी केले. ...
स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक 
पिंपरी चिंचवड, क्रीडा

स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

पिंपरी : "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन (एसआयएच) २०२२" या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (पीसीसीओई) टीम "वॉटर गार्डियन्स"ने "स्मार्ट ऑटोमेशन श्रेणी अंतर्गत" "स्मार्ट शहरांमध्ये पाण्याच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी स्मार्ट सिटी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम" हा लक्षवेधक प्रकल्प सादर करून अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी येथे आयोजित केलेल्या "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन २०२२" च्या ग्रँड फिनालेत हार्डवेअर एडिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक शेट्टी हा "वॉटर गार्डियन्स" टीमचा कॅप्टन होता या टीममध्ये सोहेल शेडबाळे, राशी राठी, रुद्रेश श्रीराव, राधिका डोईजड यांचा समावेश होता. त्यांना प्रा. प्र...
घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन
पिंपरी चिंचवड

घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १६ : सुमारे दीड लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील युवकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली स्पाइनसिटी मॉल भोसरी येथे केंद्र व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले की, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं म्हणून सरकारमध्ये बसणारी भाजपा व त्याचे नेते यांनी नोकऱ्या तर दिल्या नाहीत. परंतु, आहेत त्या नोकऱ्या सुद्धा महाराष्ट्रातील तसेच पिंपरी चिंचवड मधीलयुवकाकडून हिरावून घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?
सिटिझन जर्नालिस्ट

सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?

निगडी मधील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूब रित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतू अलीकडेच काही व्यावसायिकांनी सदर पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी 'खाऊ गल्ली' चालू केली आहे.तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार चालू केला आहे. जर का निगडी उड्डाणपुलाखाली ' खाऊ गल्लीच' उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे. दिपक खैरनार...