छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवप्रेमींचे आंदोलन
पिंपरी : इंद्रायणीनगर व मोशी प्राधिकरण व भोसरी परिसरात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचलन कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले असून त्यामध्ये जाणीवपूर्वक संघाचे हेगडेवार यांचा एक नंबर ला फोटो लाऊन त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो दोन नंबरला लाऊन त्यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याने याचा निषेध करणेकामी इंद्रायणीनगर मधील तिरुपती चौकात शिवप्रेमी व समविचारी पक्ष संघटना यांच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी व योगेश लांडगे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करून समाज भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
वास्तविक पाहता शिवरायांची हिमालयापेक्षा उत्तुंग उंची असताना या फ्लेक्समध्ये ज्यांची योग्यता नाही अशा सोबत लावलेल्या फोटो...










