काळेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर | रहिवासी सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित
पिंपरी : काळेवाडीतील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या नित्याच्याच आहे. मात्र, विजयनगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला असून अनेक सदनिकाधारक आपली सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. तर काहींनी सदनिका विकल्या असल्याची माहिती पुढे येत आहे.
काळेवाडीतील विजयनगर परिसरात अनेक सोसायट्या असून या सोसायट्यांना महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यात कमी दाबाने व दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे या सोसायट्यांना टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. याबाबत महापालिकेला सांगूनही दखल घेतली जात नाही. परिणामी अनेक सदनिकाधारक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान, काळेवाडीतील विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर कोकाणेनगर, जमा मस्जिद परिसरात देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. परिसरात राहणारे ना...