PUNE METRO : लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात; शहराध्यक्ष शंकर जगताप यांची भावना
आता पुणे ते पिंपरी प्रवास होईल अवघ्या 22 मिनिटांत
दोन मार्गांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी, दि. १ ऑगस्ट (लोकमराठी न्यूज) : पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरु व्हावी. नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळावेत. सुलभ आणि सार्वजनिक जलद वाहतुकीतून या शहराचा विकास व्हावा असे स्वप्न लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पाहिले. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पाहिलेल्या मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले अशा भावना शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मंगळवारी व्यक्त केल्या.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जगताप म्हणाले, उद्घाटन झाल्यानंतर दुपारपासूनच पिंपरी-चि...