Tag: pcmc

उन्नती फाऊंडेशन ही सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ – अश्विनीताई लक्ष्मण जगताप
पिंपरी चिंचवड

उन्नती फाऊंडेशन ही सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ – अश्विनीताई लक्ष्मण जगताप

उन्नती सोशल फाउंडेशनच्या "बेस्ट दांडिया ग्रुप डान्स स्पर्धेची" पिंपळे सौदागरमध्ये धूम युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग, स्पर्धकांवर बक्षिसांची बरसात पिंपळे सौदागर, (प्रतिनिधी) : आपल्या सर्वांवर कोरोनाचे संकट आले तेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशनची (Unnati Social Foundation) टीम नागरिकांची काळजी घेण्यात व्यस्त होती. जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जीवाची परवा न करता उन्नतीच्या टीमने नागरिकांच्या दारात जाऊन अन्नपुरवठ्यापासून ते रुग्णालयात बेड उपलब्ध करेपर्यंत कष्ट घेतले. माझ्या प्रभागातील एकाही नागरिकाच्या जीवाला धोका होऊ नये, या आकांक्षेने उन्नती सोशल फाऊंडशन लढत राहिले. ते आपल्या कार्यात यशस्वी झाले असून त्यांच्यामुळेच आपल्याला आज दांडियाचा मनसोक्त आनंद घ्यायला मिळाला. त्यामुळे उन्नती हे केवळ फाऊंडेशन नसून ती सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ आहे, असा विश्वास अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त...
संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले

मागणी लावून धरल्यानंतर इंद्रायणीनगर मधील माजी नगरसेवकाचा लेखी माफीनामा सादर पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फ्लेक्स शहरात लावले होते. त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने आवाज उठविला. संबंधीत आरएसएसच्या कार्यकर्त्याला संपर्क करून जाब विचारला. पोस्टर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संबधीत कार्यकर्त्याने शहरातील फ्लेक्स हटविले. तसेच लेखी माफीनामाही सादर केला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी दिली. काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजनांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या विचारांवर चालणारी अनेक पिढी तयार होत आहे. राजांनी रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील नागरिकांचा विचार केला. मानसन्मान द...
सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे
राजकारण, पिंपरी चिंचवड

सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. ४ ऑक्टोबर २०२२ : शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या प्रामाणिक हेतूने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने "संवाद सोसायटीधारकांशी" हा अभिनव असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण करावे, आणि त्या प्रश्‍नांवर सत्ता मिळवावी, या अपेक्षेने झपाटलेल्या एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी भाजपच्या एकनाथ पवार यांना केला आहे. शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सोसायटीधारकांशी उद्या (बुधवार) रोजी थेरगाव येथे संवाद साधणार आहेत. "संवाद सोसायटीधारकांशी" या कार्यक्रमावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी टीका केली होती. या टी...
बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी 
पुणे, सामाजिक

बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरीतील जिजामाता रूग्णालयासोबत आयोजन केलेल्या या शिबिरात सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी जिजाऊ रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साबळे, डॉ. गणेश तागडे व डॉ. स्नेहा जगदाळे, फार्मासिस्ट दूधमल जाधव, लॅब टेक्निशियन प्रीती सनगर व त्यांचे सहकारी स्टाफ तसेच आशा वर्कर, हाॅस्पीटल कर्मचारी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) यांचे समतादूत संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या शिबिराचा ५५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला...
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त रहाटणीत स्वच्छता मोहीम
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त रहाटणीत स्वच्छता मोहीम

रहाटणी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडीयम स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्तसंयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) व लाल बहादूर शास्त्री (Lalbahadur Shastri) यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व आरोग्य निरिक्षक प्रणय चव्हाण, भुषण पाटील यांनी केले. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिम्मित स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांना घरी किंवा घराचे परिसरात बंदी असलेले प्लास्टिक गोळा करून ते शाळेत जमा करण्याबावत आवाहन करण्यात आले . तसेच शाळा परिसराची स्वच्छता करून शाळा ते शिवार चौक ते शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छता मोहिमेचे बॅनर व झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर प...
एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू – प्राचार्य डॉ. पंडित शेळके 
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू – प्राचार्य डॉ. पंडित शेळके

पिंपरी : महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, चार भिंतीच्या आतील शिक्षण महाविद्यालयात मिळते, तर चार भिंतीच्या बाहेरील समाजशिक्षण राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून कार्य करताना मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचार व कार्याचे दाखले देत सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचे धडे राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळतात असा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप नन्नावरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉ. भारती यादव यांनी करून दिला. कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्...
ज्येष्ठ मंडळींनी आरोग्य संपन्न करून शतायुषी व्हावे – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ
पिंपरी चिंचवड

ज्येष्ठ मंडळींनी आरोग्य संपन्न करून शतायुषी व्हावे – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२२ : ज्येष्ठ मंडळींनी आपल्या जीवनाची वाटचाल आनंदाने, आरोग्य संपन्नतेने करून शतायुषी व्हावे. असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पोलिस उपआयुक्त मंचक इप्पर, समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव दराडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचे समतादूत प्रशांत कुलकर्णी व संगिता शहाडे तसेच शहरातील विविध भागातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण व बार्टीच्या योजनांची माहिती द...
कायदा सांगून लोकांना घाबरवू नका, ओला कचरा जिरवण्यासाठी महापालिकेचा निधी द्या; तोपर्यंत “तो” निर्णय बेमुदत स्थगित करा; आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना ठणकावले
पिंपरी चिंचवड

कायदा सांगून लोकांना घाबरवू नका, ओला कचरा जिरवण्यासाठी महापालिकेचा निधी द्या; तोपर्यंत “तो” निर्णय बेमुदत स्थगित करा; आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना ठणकावले

पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२२ : महापालिकेला सर्व प्रकारचा कर देणाऱ्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेने स्वतःचा निधी देऊन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी. तसेच २०१६ नंतरच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ओला कचरा विल्हेवाटीची यंत्रणा न उभारलेल्या बिल्डरांवर कारवाई करावी. उगाचच कायद्याचा धाक दाखवून गृहनिर्माण सोसायट्यांचा कचराच उचलणार नसल्याचे सांगत लाखो लोकांना घाबरवू नका. महापालिकेने वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचे धोरण सोडून द्यावे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेमार्फत ओला कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारली जात नाही, तोपर्यंत प्रतिदिन १०० किलोहून अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याच्या आदेशाला बेमुदत स्थगि...
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड 
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड

पिंपरी, दि. ०१ ऑक्टोबर २०२२ : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषद ही समाजातील दुर्बल, अन्याय झालेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी संस्था आहे. त्याच्या पुणे जिल्हा ( पुणे व पिंपरी चिंचवड शहर ) अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. देविदास हरिश्चंद्र शेलार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. देविदास शेलार म्हणाले, "कि आमचा मुख्य उद्देश समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे, नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे , जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे, महिलांवरील अत्याचार थांबवन्यासाठी कार्य करणे, पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध, भ्रष्टाचाराला आळा घालणे, लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत (आम आदमीपर्यंत) पोहचवणे, समाजात प्रचलित अ...
पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव

पिंपळे सौदागर, ता. 30 : येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना रूग्ण संख्या विचारात घेता अपुरा पडत आहे. तोकड्या जागेमुळे कर्मचाऱ्यांसह रूग्णांचेही मोठे हाल होतात. त्यामुळे लवकरात लवकर या दवाखान्याचा विस्तार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे. याबाबत जाधव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ एक ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक उपचार घेण्यासाठी या दवाखान्यात येतात. दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडीची सेवा घेतात. संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच बालक लसीकरण मोहीमही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी, निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जातात. परिणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ह्याच...