Tag: pcmc

ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन
पिंपरी चिंचवड

ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन

पिंपरी, ता. २७ सप्टेंबर २०२२ : ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांच्या श्रीमती मातोश्री इंदुबाई गणपत माने (वय ७२ वर्षे ) यांचे सोमवारी (ता. २६) रात्री निधन झाले. त्यांच्या मागे ॲड. सुनील माने आणि ॲड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती इंदुबाई माने यांच्या पार्थिवावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभुमी येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे
पिंपरी चिंचवड

आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे

पिंपरी : आकुर्डी प्राधिकरण येथील निवासी भागातील कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करावे. पिंपरी भाजी मंडई गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न, प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील नागरिकांच्या अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना आदी विषयांवर आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी केली. शुक्रवारी पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात आ. आण्णा बनसोडे यांनी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रसाद शेट्टी तसेच अनुप मोरे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश लांडगे, प्रतीक इंगळे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. आकुर्डी प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र ...
क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर 
पिंपरी चिंचवड

क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू व वर्ग संख्या वाढविण्याची मागणी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत वाळुंजकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार स्मार्ट शहर ओळखले जाते. शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडवण्याच्या दृष्टिकोनातून व प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधनी विद्यालय स्थापन करण्यात आले. पण, मनपाच्या माध्यमातून असणारे क्रीडा प्रबोधिनी विद्यालयमध्ये मराठी मिडीयममध्ये शिकवले जात असून यामुळे शहरातील खेळाडू विद्यार्थी यांच्या पाल्यांचा इंग्लिश मीडियममध्ये शिकण्याचा कल जास्त प्रमाण असते. यामुळे अनेक खेळाडू विद्यार्थी यांची इच्छा असून देखील क्रीडा प्रबोधनी कडे येऊ शकत नाहीत. शहरातील खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने ...
विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर
सामाजिक

विजयराव पाठक स्मृती मंचातर्फे संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबीर

पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर येथील स्वयंसेवक स्व. विजयराव गोविंदराव पाठक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर शाहूनगर येथे स्व विजयराव पाठक स्मृती मंच तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, गटाचे संघचालक नरेंद्र गुप्ता, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे, तसेच माजी नगरसेवक केशव घोळवे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, शिव शंभू प्रतिष्ठान अध्यक्ष संजय तोरखेदे व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर माने यांनी केले. ...
स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक 
पिंपरी चिंचवड, क्रीडा

स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

पिंपरी : "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन (एसआयएच) २०२२" या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (पीसीसीओई) टीम "वॉटर गार्डियन्स"ने "स्मार्ट ऑटोमेशन श्रेणी अंतर्गत" "स्मार्ट शहरांमध्ये पाण्याच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी स्मार्ट सिटी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम" हा लक्षवेधक प्रकल्प सादर करून अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी येथे आयोजित केलेल्या "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन २०२२" च्या ग्रँड फिनालेत हार्डवेअर एडिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक शेट्टी हा "वॉटर गार्डियन्स" टीमचा कॅप्टन होता या टीममध्ये सोहेल शेडबाळे, राशी राठी, रुद्रेश श्रीराव, राधिका डोईजड यांचा समावेश होता. त्यांना प्रा. प्र...
घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन
पिंपरी चिंचवड

घेऊन पन्नास खोके तरुणांना राज्य सरकारने दिले धोके | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १६ : सुमारे दीड लाख तरुणांना रोजगार देणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तळेगाव येथून गुजरातला गेल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील युवकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली स्पाइनसिटी मॉल भोसरी येथे केंद्र व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले की, प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या युवकांना देऊ असं म्हणून सरकारमध्ये बसणारी भाजपा व त्याचे नेते यांनी नोकऱ्या तर दिल्या नाहीत. परंतु, आहेत त्या नोकऱ्या सुद्धा महाराष्ट्रातील तसेच पिंपरी चिंचवड मधीलयुवकाकडून हिरावून घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?
सिटिझन जर्नालिस्ट

सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?

निगडी मधील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूब रित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतू अलीकडेच काही व्यावसायिकांनी सदर पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी 'खाऊ गल्ली' चालू केली आहे.तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार चालू केला आहे. जर का निगडी उड्डाणपुलाखाली ' खाऊ गल्लीच' उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे. दिपक खैरनार...
भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी मधील इंडस्ट्रीज उद्योजक व कामगार यांनी आम आदमी प्रवेश केला. आपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते व आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल महादेव टाकळे (दिघी), सुरेश बाबू कांबळे (भोसरी), गौतम भगवान इंगळे (काळेवाडी), सुनील सूर्यकांत शिवशरण (भोसरी), पांडुरंग जगन्नाथ राऊत (भोसरी), बालाजी शामराव कांबळे (भोसरी), राहुल झोटिंग कांबळे (मोशी) आदींनी प्रवेश केला. या वेळी आप पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डाॅक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, आप महिला नेत्या सिता केंद्रे, कमलेश रनावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंडस्ट्रीज उद्योजक पांडुरंग राऊत, सुरेश कांबळे व आनिल टाकळे यांनी भाजप सरकार वरती नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जाणे हे महार...
चिंचवड व काळेवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षामध्ये प्रवेश
पिंपरी चिंचवड

चिंचवड व काळेवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षामध्ये प्रवेश

पिंपरी : दिल्ली, पंजाब यशा नंतर पिंपरी चिंचवडमध्ये ही आम आदमी पार्टीचे काम जोरात सुरू आहे. सोशल मीडियासह, आम आदमी पार्टीमध्ये युवा कार्यकर्ते उस्फूर्त प्रवेश करत आहेत. आज चिंचवड व काळेवाडी भागातील काही युवा कार्यकर्ते अजय सांगळे, अमेय बलकवडे, चिन्मय बाग, ऋतुज भंडारे, भूषण शेलार व अकबर शेख, रवींद्र खेडेकर आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. हा प्रवेश आप पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ. अमर डोंगरे, आप प्रवक्ते प्रकाश हगवणे यांच्या उपस्थित करण्यात आला यावेळी आप प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी बोलताना म्हटले, आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या निवडणुकीत सर्व जागा ताकतीनीशी लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये युवकांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले. लवकरच गुजरातमध्ये आम आदमी पार्टी विजय संपादन करेल, असे डॉक्टर अमर डोंगरे...
कोविड काळात काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम करा : यशवंत भोसले
पिंपरी चिंचवड

कोविड काळात काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम करा : यशवंत भोसले

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोविड काळामध्ये मानधनावर काम करणाऱ्या ६८७ कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, असे आदेश राज्य सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिले आहेत. अशी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. याविषयी अधिक माहिती देताना यशवंत भोसले यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोरोना काळामध्ये एएनएम, जीएनएम नर्सेस, टेक्निशियन अशा विविध पदांवर मानधनावर कर्मचारी काम करीत होते. या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे असा ठराव पिंपरी चिंचवड महापालिकेने १८ मार्च २०२० रोजी मंजूर केला होता. हा ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. यामध्ये आरोग्य व वैद्यकीय विभागातील विविध पदांचा समावेश होता. या ठरावास शासनाची मंजुरी मिळण्याच्या अगोदरच पिंपरी चिंचवड आयुक्तांनी २०२१ मध्ये नर्सेस व आरोग्यातील तांत्रिक कर्मचाऱ्य...