Tag: pcmc

काळेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर | रहिवासी सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर | रहिवासी सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित

पिंपरी : काळेवाडीतील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या नित्याच्याच आहे. मात्र, विजयनगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला असून अनेक सदनिकाधारक आपली सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. तर काहींनी सदनिका विकल्या असल्याची माहिती पुढे येत आहे. काळेवाडीतील विजयनगर परिसरात अनेक सोसायट्या असून या सोसायट्यांना महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यात कमी दाबाने व दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे या सोसायट्यांना टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. याबाबत महापालिकेला सांगूनही दखल घेतली जात नाही. परिणामी अनेक सदनिकाधारक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, काळेवाडीतील विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर कोकाणेनगर, जमा मस्जिद परिसरात देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. परिसरात राहणारे ना...
महाराष्ट्र महिला संघाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद
क्रीडा

महाराष्ट्र महिला संघाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद

एसबी पाटील पब्लिक स्कूलच्या हर्षिता काकडेची चमकदार कामगीरी पिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) : जम्मू येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या 55 व्या कनिष्ठ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्य पदक पटकाविले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एसबी पाटील पब्लिक स्कूलची हर्षिता काकडे हिने महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात चमकदार कामगीरी केली. पश्चिम बंगाल संघाने महिलांमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय पातळीवर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत कनिष्ट महिला गटासाठी निवड होणारी हर्षिता काकडे हि पिंपरी चिंचवड शहरातील आतापर्यंतची एकमेव महिला खेळाडू आहे. हर्षिताला प्रशिक्षक धनाजी पाटील, मनोज काळे, प्रिया जोशी, सुनिता वासुदेव व श्रीकांत देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राचा संघात हर्षिता काकडे सह सृष्टी भावसार, र...
आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे
पिंपरी चिंचवड, राजकारण

आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे

पिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगीत केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकावर या विषयी आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. आता सर्व पक्षिय नेत्यांवर आणि केंद्र तसेच राज्य सरकारवर ओबीसी समजाचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीगावपातळीपासून पुन्हा ओबीसींचे मजबूत संघटन उभे करु या अशी हाक माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे यांनी केले. मंगळवारी (दि. 7 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसींच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक भोसरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वसंत लोंढे बोलत होते. यावेळी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रताप गुरव, आनंदा कुदळे, पी. के. महाजन, वंदना जाधव, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, शहर महिला...
महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – रविकांत वरपे
पिंपरी चिंचवड, राजकारण

महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – रविकांत वरपे

राष्ट्रवादी युवकची मनपा निवडणूकपुर्व आढावा बैठक संपन्न पिंपरी, ता. ९ : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली २०१७ ते २०२१ या कालावधीत युवक कॉंग्रेसचे उत्कृष्ट काम झाले आहे. महानगरपालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारी राजवटीचा पर्दाफाश वेळोवेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केला आहे. आता यात अधिक आक्रमकपणा आणि सातत्य ठेवून २०२२ च्या सार्वत्रिक निवडणूकांना पुर्ण क्षमतेने सामोरे जाऊन महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केले. बुधवारी (दि. ८ डिसेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खराळवाडी पिंपरी येथिल कार्यालयात शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली २०२२ च्या निवडणुकीच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. य...
काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : काळेवाडीतील विजयनगर परिसरात दिवसाआड व अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले असून काही भागात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची पिण्याची पाण्याची गरज व आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता काळेवाडीत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत इरफान शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कायमस्वरूपी निवासी असून आम्ही नियमारित्या शासकीय, निमशासकीय कर भरत आहोत. तसेच मतदानाचा हक्क देखील बाजवितो. आपणास माहिती देऊ इच्छितो की, आम्ही आपणास मार्च महिन्यात दररोज पाणीपुरवठा करण्यासंबंधी विनंती अर्ज केले होते. तसेच नागरिकांना पाण्याची गरज वादळी आहे. मात्र, अद्याप कोणतेच ठोस निर्णय ना झाल्याने विजयनगर भागात राहणारे सदनिकाधार...
महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य

जनतेसाठी अभिप्राय फॉर्म ठेवण्याचे मा आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश पिंपरी : मनपामधील विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना अधिकाऱ्यांचा उर्मटपणा मुजोरपणा अनुभवास येतो, बरेचदा अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतात, असले तरी नागरिकांची भेट नाकारतात. त्यांना तासन तास ताटकळत ठेवतात. त्याअनुषंगाने राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांनी सार्वजनिक प्राधिकरणाणे अभ्यागतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भात जागृत नागरिक महासंघाच्या नितीन यादव, उमेश सणस, राजेश्वर विश्वकर्मा व अशोक कोकणे या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांची दि एक नोव्हेंबर 2021 रोजी समक्ष भेट घेऊन त्यांना कोकण खंडपीठाच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. जागृत नागरिक महासंघाच्या निवेदनावर व्यापक समाजहित लक्षात घेत, अतिशय सकारात्मक प्र...
भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई

पिंपरी : भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर फलक आणि होर्डिग्ज सर्वत्र झळकले आहे. फूटपाथ, चौका-चौकात, रस्त्यावर हे फलक लागल्याने शहराच्या विद्रुपीकरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अनधिकृत फलक, होर्डिग्ज काढण्याचे आदेश क्षेत्रीय अधिका-यांना कारवाईचे दिले. त्यानूसार महापालिकेच्या ई आणि क प्रभागात शुक्रवारी (ता. २६) अनधिकृत फलक काढण्यात सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा शनिवारी वाढदिवस आहे. आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरभर आमदार लांडगे यांचे ब्रॅडींग आणि वातावरण निर्मिती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. त्यानूसार भोसरी विधानसभा मतदार संघात त्यांच्या इच्छुक उमेदवार, समर्थक, कार्यकर्त्यांनी प्रत्येक च...
महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्यात संवेदना जगाओ उपोषणाला पोलीसांनी परवानगी नाकारली
पिंपरी चिंचवड

महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्यात संवेदना जगाओ उपोषणाला पोलीसांनी परवानगी नाकारली

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त दोघेही संविधानाच्या कलम ५१अ (ग) याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच अवैध वृक्षतोडी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाही न करता तक्रारदारांना व झाडांसाठी न्याय मागणाऱ्या नागरिकांकडेही कानाडोळा करीत आहेत. यासाठी न्याय मागण्यासाठी व महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात पर्यावरण संबंधी संवेदनशीलता यावी, म्हणून एक दिवसीय संवेदना जगाओ सांकेतिक उपोषण वृक्ष मित्रांच्या वतीने संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) करण्यात येणार होते. मात्र, या उपोषणास कोरोना महामारीचे कारण देऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कलम 51-A (g) जे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे: “जंगल, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहै. त्याच अनुषंगाने असंवेदनशील पोलिसांची "संविधा...
भाजपच्या धोरणांमुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम – विशाल वाकडकर
पिंपरी चिंचवड, राजकारण

भाजपच्या धोरणांमुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम – विशाल वाकडकर

विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना पदाधिका-यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पिंपरी : केंद्रातील भाजप सरकारने देशभर भाजप विरोधी असणा-या राज्यसरकारांना दबावतंत्राचे राजकारण करुन हुकूमशाहीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पातळी सोडून सुरु असणा-या या राजकारणाला नागरिक ओळखून आहेत. मागील सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चूकीची धोरणे राबवली आहेत. त्यामुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. याचा सर्वात जास्त फटका तरुणांना व सुशिक्षित बेरोजगारांना बसला आहे. हे सुशिक्षित बेरोजगार तरुण घरोघरी जाऊन भाजपची चूकीची धोरणे नागरिकांपुढे मांडतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले. वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड कामगार संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांनी व मुख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्य...
वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी पदवी प्रदान
पिंपरी चिंचवड

वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी पदवी प्रदान

पिंपरी : चिंचवड गावातील वेदमूर्ती चंद्रशेखर गोविंदतात्या रबडे यांचे चिरंजीव वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी ही पदवी वेदमूर्ती दिनकर भट्ट फडके गुरुजी पुणे, व वेदमूर्ती योगेश बोरकर गुरुजी गोवा, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये आजतागायत षडंगवित घनपाठी ही पदवी मिळविणारे वेदमूर्ती विनायक रबडे एकमेव आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचाही सन्मान करण्यात आला. वयाच्या बाराव्या वर्षी ऋग्वेद दशग्रंथ घनपाठ, हा एकच ध्यास धरून कशाचीही पर्वा न करता सलग १८ वर्षे त्यांनी ऋग्वेद गुरुकुल पाठशाळेत वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांचेकडे अध्ययन केले. त्यांच्या अथक परिश्रमाने हा सन्मान मिळाला असल्याचे त्यांचे बंधु कौस्तुभ रबडे यांनी सांगितले....