Tag: pcmc

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध

चिंचवड, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात भिडे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले. या वेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विनिता तिवारी, रोहित भाट, कुंदन कसबे, विक्रांत सानप, जिफिन जॉन्सन, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, सुभाष भुसने, सुमित सुतार व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता तरी त्या...
Job Opportunities : नोकरीची संधी
नोकरीविषयक

Job Opportunities : नोकरीची संधी

इंदिरा ग्लोबल स्कुल ऑफ बिझनेस / Indira Global School Business प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कंप्यूटर सायन्स भारती विद्यापीठ / Bharati Viyapeeth सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी पुणे पेट्रोल पंपावर कामगार पाहिजे पेट्रोल पंपावर महिला व पुरूष कामगार पाहिजे. पत्ता- जयहिंद हायवे सर्व्हिस स्टेशन, चिंचवड स्टेशन, निरामय हॉस्पिटल शेजारी. संपर्क : 9822551162...
Pimple Saudagar : पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
शैक्षणिक

Pimple Saudagar : पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पिंपळे सौदागर (पुणे) : वै. ह. भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे व प्राचार्या धनश्री सोनवणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्या धनश्री सोनवणे यांनी या महापुरूषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील भाषणे सादर केली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना समवेत सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेशना चक्रबर्ती यांनी केले. तर आभार सुवर्णा धातरक यांनी मानले....
PUNE METRO : लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात; शहराध्यक्ष शंकर जगताप यांची भावना
पिंपरी चिंचवड

PUNE METRO : लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात; शहराध्यक्ष शंकर जगताप यांची भावना

आता पुणे ते पिंपरी प्रवास होईल अवघ्या 22 मिनिटांत दोन मार्गांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी, दि. १ ऑगस्ट (लोकमराठी न्यूज) : पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरु व्हावी. नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळावेत. सुलभ आणि सार्वजनिक जलद वाहतुकीतून या शहराचा विकास व्हावा असे स्वप्न लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पाहिले. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पाहिलेल्या मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले अशा भावना शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मंगळवारी व्यक्त केल्या. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जगताप म्हणाले, उद्घाटन झाल्यानंतर दुपारपासूनच पिंपरी-चि...
स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड
साहित्य

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड

निगडी, प्राधिकरण (प्रतिनिधी) : जून महिन्यात सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या "स्वानंद संघाचे " बक्षीस वाटप नुकताच कार्यक्रमात संयोजकांकडून जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक- पाऊस नक्षत्रे, द्वितीय क्रमांक -पाऊस पाऊस व तृतीय क्रमांक - पाऊस गाणीया कार्यक्रमास मिळाला. हा कार्यक्रम " पाऊस " या संकल्पनेवर आधारित होता. "पाऊस नक्षत्रे " कार्यक्रमाचे लेखन पुष्पा नगरकर यांनी केले होते. सर्व रोख बक्षिसे पाकिटातून देण्यात आली. त्यावेळी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. पहिले बक्षीस अविनाश पाठक यांचे हस्ते, दुसरे -डॉ.शुभांगी म्हेत्रे यांच्या हस्ते, तिसरे-विदुला आरेकर यांच्या हस्ते देण्यात आले. ज्योती कानेटकर, उषा भिसे, सुनिता यन्नुवार, मालती केसकर, उमा इनामदार,रजनी गांधी, स्मिता देशपांडे,माधुरी ओक, शरद यन्नुवार, अशोक अडावदकर, आनंदराव मुळूक, चंद्रशेखर जोशी या ...
साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ
पुणे

साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ

निगडी प्राधिकरण, (बाबू डिसोजा कुमठेकर) : साहित्य सम्राट पुणे व मातंग विकास संस्था खडकी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ तीन दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश रासगे, समाजभूषण पुरस्कारथी शंकरभाऊ तडाखे, अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गणेश भालेराव, लहुजी महासंघाचे प्रकाश वैराळ, लहुजी पॅन्थर संघटनेचे महेश सकट, सुनील मोरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलसचिव माननीय डॉ. मुंजाजी रासवे यांनी आंदोलनस्थळी शुद्धीपत्र मिळणे बाबत या विषयास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमातील ग्रामीण साहित्य आणि शोध या ग्रंथातील अण्णा भाऊ साठे यांच्या “फकीरा” या काद...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन 
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

निगडी, ता. ०१ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सजी वर्की, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, प्रदेश सचिव गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विक्रांत सानप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. समाजसुधारक, समाजप्रबोधनकार अशा विविध पैलूंपैकी जागतिक ख्यातीचे लेखक म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ओळख आहे. भारतीय भाषेसह जगातील अनेक भाषांमधे त्यांच्या पुस्तकांची भाषांतर झाले आहे. त्यांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास हजारो अनुय...
PIMPRI CHINCHWAD : शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!
राजकारण

PIMPRI CHINCHWAD : शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!

भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा नियोजनात पुढाकार ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातील 3 हजार नागरिकांची उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो टप्पा दोन, 'वेस्ट टू एनर्जी’, आणि आवास योजनेच्या लोकार्पण व भूमिपूजन पिंपरी, 31 जुलै : राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प , सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार घरांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातून 3 हजार नागरिक तसेच लाभार्थी हजेरी लावणार आहेत. अशी माहिती भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. प...
CHAKAN : चाकण एमआयडीसीची वाटचाल फॉक्सकॉन-वेदांताच्या दिशेने
पुणे

CHAKAN : चाकण एमआयडीसीची वाटचाल फॉक्सकॉन-वेदांताच्या दिशेने

केंद्र आणि राज्य शासनाकडून होतात केवळ विकासाच्या गप्पा विकास आराखड्याची ब्ल्यू प्रिंट निघालीच नाही चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांचा घणाघात चाकण (दि. ३१) : भारत सरकारला जीएसटीच्या रूपाने सर्वात जास्त महसूल मिळवून देणारी एकमेव एमआयडीसी म्हणजे चाकण. शेजारीच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून बिरूद मिरविणारी कॉस्मोपॉलिटिन सिटी म्हणजेच पिंपरी चिंचवड शहर आहे. याच शहरातील बहुसंख्य कमाईदार वर्ग इथेच गलेलठ्ठ पगारावर कार्यरत आहे. म्हणजेच चाकण एमआयडीसीच्या जोरावरच आज सर्वत्र मोठे अर्थकारण होत आहे. त्यामुळे येथील सुविधा देखील 'फाइव्ह स्टार' दर्जाच्या असायला हव्यात. परंतु, येथे विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' निघालीच नाही. त्यामुळे आजमितीला दुर्दैवाने चाकण MIDC परिसर हा पायाभूत सुविधांच्या बाबतीत अत्यंत मागासलेला भाग आहे, अशी खंत Chakan MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती 
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती

पुरोगामी विचाराने समृद्ध युवकांची नव्याने नेमणूक करणार - इम्रान शेख कष्टकरी कामगार वंचित दुर्लक्षित घटक यांच्या मुलांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार पिंपरी, ता. २९ जुलै (लोकमराठी न्यूज) : " शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. म्हणुन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान शहर कार्यकारणी आम्ही बरखास्त करत आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या वरील पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रांताध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोलजी कोल्हे, आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची नवीन कार्यकारणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या देण्या...