डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू
उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
काळेवाडी : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. तारिक शेख (Dr Tariq Shaikh) व डॉ. आस्मा शेख (Dr Asma Shaikh) यांचा काळेवाडी येथील तापकीर चौकात 'राहत क्लिनिक' या नावाने दवाखाना सुरू झाला आहे. या क्लिनिकचे उद्घाटन उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले.
त्यावेळी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, दंत चिकित्सक डॉ. राजू कुंभार, ओझनटेक सोलूशनचे संचालक प्रसाद गुप्ते, मोहम्मद सलीम बेलीफ, प्रशांत भोसले, संतोष जाधव, डॉ. तारिक शेख, डॉ. आस्मा तारिक शेख, पत्रकार रविंद्र जगधने, कालीदास जगधने, अजय वायदंडे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील खेडोपाड्यात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन डॉ. शेख यांनी सेवा दिली आहे. रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले कर्तव्य बजावणारे डॉ. तारि...









