KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
माजी नगरसेविका निता पाडाळे यांच्या पाच वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी (प्रतिनिधी) : काळेवाडी (प्रभाग क्रमांक २२) येथील मुख्य रस्त्याच्या पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामासाठी माजी नगरसेविका निता पाडाळे यांनी मागील पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेविका निता पाडाळे, माजी नगरसेविका उषामाई काळे, दिलीप आंब्रे, विलास पाडाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नढे, विनोद तापकीर, तानाजी काळे, प्रकाश लोहार, पांडुरंग पाडाळे, अॅड. हर्षद नढे, धर्मा पवार, चंद्रशेखर उंडीकर, शहाजीलाल आत्तार, विकास साठे, अरूण मैराळे, रवींद्र रहाटे, जयश्री नढे, पुष्पा नढे, भरत ठाकुर, राव काका व स्वामी काका, अशोक पवार, ...