सावित्रीबाई यांनी शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली – महापौर माई ढोरे
पिंपरी : "स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, थोर समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान अतिशय मोलाचे असुन सावित्रीबाई यांनी शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली त्यामुळे आजची स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती, महापौर पदी विराजमान होवू शकली" असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षण दिनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही १२ महिलांना महापौर माई ढोरे, उपमहापौर केशवजी घोळवे, व स्थायी समितीचे विद्यमान सभापती स...