पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण

पिंपरी, दि.२२ (लोकमराठी) – एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत सामुहिक नमाज अदा केली. मौलाना यांनी ईदची नमाज सर्वांना पढवली

ईद निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

समस्त समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्‍या. नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाजबांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता.

रिपब्लिक पार्टी अॉफ इंडीया (अ) वाहतुक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीजभाई शेख म्हटले, ए.बी शेख साहेब यांनी नेहरुनगर कब्रस्थानाला योगदान देऊन. ए.बी शेख साहेब यांच्या हाताने कब्रस्थान उभारण्यात आले.आज ते आमच्या मधी नाहीत त्यांची आठवण म्हणून कब्रस्थानाला काहिच कमी पडू देणार नाही. असे आवाहन त्यांनी केले.

पोलिस उपआयुक्त विनायक पाटील , पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे व सर्व पोलिस अधिकाऱ्यांच अजीजभाई शेख व ट्रस्टींनी त्यांचे मानसन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ,मा.नगरसेवक हमीदभाई शेख, कामगार नेते इरफान सय्यद, भजपा अल्पसंख्याक पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष फारुक इनामदार यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.