Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर आणि उच्च शिक्षण विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 'उद्योजकता' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डायरेक्टर जनरल एस.टी.पी. पुणे येथील सीईओ राजेंद्र जगदाळे व मैत्री फाउंडर सेलचे प्रमुख कमलेश पांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे, सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट विभाग) प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमलेश पांडे म्हणाले की, स्टार्टअप चालू करून त्यापासून उत्पन्नाचे साधन मिळवायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक महाविद्...