संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले
मागणी लावून धरल्यानंतर इंद्रायणीनगर मधील माजी नगरसेवकाचा लेखी माफीनामा सादर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फ्लेक्स शहरात लावले होते. त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने आवाज उठविला. संबंधीत आरएसएसच्या कार्यकर्त्याला संपर्क करून जाब विचारला. पोस्टर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संबधीत कार्यकर्त्याने शहरातील फ्लेक्स हटविले. तसेच लेखी माफीनामाही सादर केला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.
काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजनांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या विचारांवर चालणारी अनेक पिढी तयार होत आहे. राजांनी रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील नागरिकांचा विचार केला. मानसन्मान द...