संविधान लागू झाल्यापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच असताना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे – प्रा. बी. बी. शिंदे
चिंचवड, ता. २६ : आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असून, खरे बोलणे हा देशद्रोह ठरवला जात आहे. शिवाय हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. जेव्हापासून देशात संविधानाचा आमल सुरू झाला, तेव्हापासून सत्तेत व प्रशासनात हिंदूच तर आहेत. मग यांना कसले हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे. यांना हिंदुराष्ट्र या नावाने, ब्राह्मण राष्ट्र, मनुस्मृती, जातिभेदावर आधारित असणारे राष्ट्र निर्माण करून, भारतीय संविधान बाजूला करावयाचे आहे. हे बहुजनांनी पक्के लक्षात ठेवून, त्यांना खऱ्या अर्थाने सतेतून दूर करणे आवश्यक आहे. त्याकरिता या देशातील सर्व भारतीय नागरिकांनी सम विचारांनी आपले सर्व गट तट, विविध पक्ष, संघटना, विसर्जित करून, या देशातील बहुजन समाजाला न्याय मिळणे कामी, सर्वांनी या विषमतावादी शत्रूचा नायनाट करणेसाठी, सर्वांनी मिळून, एकत्रित लढा लढण्याची काळाची गरज आहे. हीच खरी या रयतेच्या राज...










