संत निरंकारी मिशनचा क्षेत्रिय इंग्रजी माध्यम संत समागम संपन्न
काळेवाडी (लोकमराठी न्यूज) : निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी येथे दि. १६ जुलै २०२३, रविवार रोजी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत संत निरंकारी मिशनचा विशाल इंग्रजी माध्यम संत समागम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोन मधून ३००० पेक्षा अधिक संख्येने भाविक भक्त उपस्थित झाले होते, विशेषतः यामध्ये युवा संत जास्त संख्येमध्ये सहभागी झाले होते. आज निरंकारी मिशनचा संदेश जगातील ६० पेक्षा अधिक देशामध्ये पोहोचला आहे, इंग्रजी ही जागतिक भाषा असून निरंकारी मिशनची ही प्रेमाची शिकवण संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्यासाठी इंग्रजी भाषेमधून सत्संगाचे आयोजन करण्यात येते.
आपला जन्म या पृथ्वीवर आमच्या मर्जीने नाही तर परमात्म्याच्या इच्छेने झाला आहे, मनुष्य हि परमात्माची एक सर्वोत्तम रचना आहे आणि परमात्माला देखील जेव्हा अवतार घ्यायचा असतो त...










