बाईपण भारी देवा….! विशेष मुलांच्या माता-भगिनींसाठी सप्तर्षी फाउंडेशनच्या संकल्पनेतून सहलीचे आयोजन
पिंपरी (लोकमराठी) : विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातांवर व भगिनींवर विशेष मुलांना सांभाळण्याची मुख्यत्वे जबाबदारी असते. त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांचे स्वतःसाठी एक दिवस त्यांना मुक्तपणे संवाद व संचार करण्यासाठी मिळावा म्हणून विशेष मुलांच्या माता व भगिनींसाठी सदर सहलीचे आयोजन अंजनवेल कृषी पर्यटन मुळाशी, पुणे येथे दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते.
सदर उपक्रमांतर्गत जवळपास अनेक विशेष मुलांच्या माता आणि बहिणींचा संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषण मुक्त वातावरणात, आनंदात तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत पार पडला.
विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातां व भगिनी यांनी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व कुंदाताई भिसे यांचे मनापासून आभार मानले. अनेक महिला आयोजकांचे व व्यवस्थापकांचे आभार मानताना भावुक झाल्या, वर्षातले 365 दिवस कुटुंबासाठी देत असताना एखादा द...