Tag: Pune

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते : सतिश काळे पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील केएसबी चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव जाधव, शहर अध्यक्ष सतीश काळे, सचिव मंगेश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सतीश काळे म्हणाले की, " राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणुन साजरा केला जातो. समता, बंधुत्व तत्त्वांची शिकवण देणारे व आरक्षण धोरण प्रभावीपणे राबविणारे महान राजे म्हणुन शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते आहेत...
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांना तब्बल पाच महिन्यांपासून ‘आहार पुरवठा’ नाही
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांना तब्बल पाच महिन्यांपासून ‘आहार पुरवठा’ नाही

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांसाठी 'जननी सुरक्षा' योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या आहार पुरवठ्यासाठी नियुक्त असणाऱ्या ठेकेदाराची मुदत गेल्या फेब्रुवारी महिन्यात संपलेली आहे.त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून गर्भवती महिलांना करण्यात येणारा 'आहार पुरवठा' बंद असल्यामुळे शहरातील हजारो मातांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच हि योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत दिपक खैरनार (Dipak Khairnar) यांनी पुण्याचे विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोर-गरीब तसेच आर्थिक दुर्बल घटकातील महिला प्रसु...
‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’ 
पुणे, सामाजिक

‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’

दिवे घाट, पुणे (लोकमराठी न्यूज) : 'प्लस्टिक मुक्त वारी ' या उपक्रमांतर्गत " नातं विश्वासाचे " या क्लब ने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिरिंग व रिसर्च मधील NSS च्या स्वयंसेवकांना सहभागी होण्याची संधी मिळाली. “नातं विश्वासाचे”क्लब व एन एस एस (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च )च्या एकूण ८० युवकांच्या व ८ शिक्षकांच्या समूह तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खरं तर जास्त करून सर्वांची ही पहिलीच वारी पण ३२ किलोमीटर चा प्रवास सर्वांनी सुखरूप पणे पूर्ण केली. दोन्ही पालखी चे दर्शन घेत पुणे स्टेशन पासून सासवड पर्यंतची ३२ किलोमीटर ची पाय वारी पूर्ण केली. त्यात सर्वात कठीण टप्पा मानला जाणाऱ्या ४ किलोमीटर चा दिवे घाट सर्व ८० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. दिवे घाटात सर्व विध्यार्थ्यांनि एकूण १०८ पोती ,प्रत्...
वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
पिंपरी चिंचवड

वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी पिंपरी : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानावेळी पोलीसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असून हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे. काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली नढे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी स्वाती शिंदे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा निर्मला खैरे, शबाना शेख, महिला शहर उपाध्यक्षा आशा भोसले, रंजना सौदेकर आदी उपस्थित होत्या. Pimpri Chinchwad Police Commissioner यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) व संतश्...
PIMPRI CHINCHWAD : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अंमली विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या; १ गावठी पिस्टल आणि १ जीवंत काडतुस केले जप्त
क्राईम

PIMPRI CHINCHWAD : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अंमली विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या; १ गावठी पिस्टल आणि १ जीवंत काडतुस केले जप्त

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पोलीस (PCPC) रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड अंमली विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्हेगाराकडुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ०१ जीवंत काडतुस पथकाने जप्त केले आहे. या गुन्हेगारावर १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन तडीपारीची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात आली आहे. विशाल शहाजी कसबे असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आधिकारी यांच्या सुचना प्रमाणे अंमली विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवार (ता.७) रोजी पेट्रोलींग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार संदिप पाटील व अशोक गारगोटे यांना माहीती मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार विशाल कसबे हा वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळाखडक येथील पाण्याच्या टाकी जवळ थांबलेला असुन त्याच्या जवळ पिस्टल आहे. मिळालेली माह...
‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
पिंपरी चिंचवड

‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे

तब्ब्ल १५०० 'सायकलकरी वारकऱ्यांच्या' वारीला दाखविला भगवा झेंडा पिंपरी (दि. ०३) : भारतातील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इन्डो अथलेटिक्स सोसायटीच्या सायकल वारीने आज देहू येथील गाथा मंदिर परिसरातून प्रस्थान केले. तब्ब्ल १५०० 'सायकलकरी वारकऱ्यांच्या' पुणे-पंढरपूर-पुणे वारीला आज शनिवारी (दि. ३) रोजी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे (Unnati Social Foundation) संस्थापक संजयशेठ भिसे यांनी भगवा झेंडा दाखवला. या वारीसाठी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. हे सायकलस्वार तब्बल पाचशे किलोमीटरचे अंतर केवळ दोन दिवसात पार करणार आहेत. सायकल वारीचे हे त्यांचे सातवे वर्ष आहे. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखेडे, प्रकाश शेडबाळे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, वैद्यनाथ हॉस्पिटल औरंगाबादचे डॉक्टर संदीप सानप...
या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
क्राईम

या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून

पिंपरी चिंचवड : चिखली मध्ये एका मित्राने त्याच्या साथीदारासोबत मिळून मित्राला गोळ्या घालून ठार मारले. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली. या खुनाचे कारण अगदी क्षुल्लक आहे. मित्राची प्रतिष्ठा वाढू लागल्याने हा खून झाल्याचे समोर आले आहे. कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय 21, रा. महादेवनगर, चिखलीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (वय 38, रा. चांदूस, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ उर्फ सोन्या पानसरे, सिद्धार्थ कांबळे (दोघे रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड) आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी नवरात्रीच्या उत्सवात विकास साने यांनी पाटीलनगर चिखली येथील मैदानावर दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता. त्या...
सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
आरोग्य, मोठी बातमी

सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न

पिंपरी चिंचवड : हृदयाला जोडणारी मुख्य धमनी फाटलेल्या २१ वर्षीय तरूणावर सिनेर्जी हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये जटील अशी बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली. सुमारे सात ते आठ चालणाऱ्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावून तरूणाला जीवनदान दिले. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल (Dr Gautam Jugal) व डॉ. सचिन हुंडेकरी (Dr Sachin Hundekari) , ह्रदय शल्य चिकित्सक डॉ. स्मृती हिंदारीया (Dr Smurti Hindaria) , भुलतज्ञ डॉ. सुहास पाटील (Dr Suhas Patil) यांचा सहभाग होता. अक्षय माने असे या तरूणाचे नाव असून छातीत व पाठीत तिव्र वेदना आल्यामुळे तो सिनेर्जी हॉस्पिटल येथे आला असता, ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल यांनी पुर्ण तपासणीअंती, त्याला एओर्टिक एन्युरिझम (महाधमनी विकार) व टाईप-ए-एओर्टीक डिसेक्शन म्हणजेच महाधमनी विच्छेदन असल्याचे निदान क...
आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे 
पुणे

आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा नारायणगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा आहे, म्हटलं तर समाधानाचा, अगदी दसरा - दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे. त्यामुळे 'याचसाठी केला होता अट्टाहास' अशी भावना सर्वांच्या मनात आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच हे संपूर्ण यश तमाम बैलगाडा मालक, शौकिनांचे असल्याचे त्यांनी सांगितले. https://youtu.be/r_HajS04WlI बैलगाडा शर्यतींवर लवकरच आपण चित्रपट बनवणार असल्याचे सांगून त्याची तयारी आधीपासूनच सुरू झाली असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. बैलगाडा मालकांचे कष्ट, त्यांचं बैलांशी असलेलं नातं या सगळ्याचा उहापोह यात असेल त्याचबरोबर एक आंतररा...