Tag: Pune

आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे
पिंपरी चिंचवड

आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे

पिंपरी : आकुर्डी प्राधिकरण येथील निवासी भागातील कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करावे. पिंपरी भाजी मंडई गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न, प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील नागरिकांच्या अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना आदी विषयांवर आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी केली. शुक्रवारी पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात आ. आण्णा बनसोडे यांनी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रसाद शेट्टी तसेच अनुप मोरे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश लांडगे, प्रतीक इंगळे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. आकुर्डी प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र ...
क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर 
पिंपरी चिंचवड

क्रिडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू करा – विशाल वाळुंजकर

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा प्रबोधनी माध्यमिक विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश वर्ग चालू व वर्ग संख्या वाढविण्याची मागणी भाजपा सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत वाळुंजकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार स्मार्ट शहर ओळखले जाते. शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडवण्याच्या दृष्टिकोनातून व प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा प्रबोधनी विद्यालय स्थापन करण्यात आले. पण, मनपाच्या माध्यमातून असणारे क्रीडा प्रबोधिनी विद्यालयमध्ये मराठी मिडीयममध्ये शिकवले जात असून यामुळे शहरातील खेळाडू विद्यार्थी यांच्या पाल्यांचा इंग्लिश मीडियममध्ये शिकण्याचा कल जास्त प्रमाण असते. यामुळे अनेक खेळाडू विद्यार्थी यांची इच्छा असून देखील क्रीडा प्रबोधनी कडे येऊ शकत नाहीत. शहरातील खेळाडू घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : स्वतःची ब्युटी सलून, स्पा थेरपी अँड मॅनेजमेंट, ब्युटी कौन्सेलर, मेकअप आर्टिस्ट, मेकअप ट्रेनर, हेअर ड्रेसर, हेअर डिझायनर, न्यूट्रिशन डायजेशन कन्सल्टंट, फिटनेस ट्रेनर अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ब्युटी आणि वेलनेस पदवीस्तरीय कोर्स करणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम करून आपण स्वावलंबी जीवन जगले पाहिजे. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलांबरी थोरात यांनी बी.होक. विभाग आयोजित एक दिवसीय ब्युटी अँड वेलनेस च्या सेमिनारमध्ये व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, कौशल्यपूर्ण कोर्स करून जीवनात यशस्वी व्हा. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थ्यांना पदवीबरोबर कौशल्याचे धडे या कॉलेजमध्ये दिले जातात. आपल्या भावी जीवनासाठी कौशल्यपूर्ण शिक्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग, संशोधन विभाग, ग्रंथालय विभाग व आय.क्यू.ए.सी.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीचे सेमिनार घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रल्हाद जाधव यांनी विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपीराइट व ट्रेडमार्क याविषयीचे महत्त्व सांगितले. तसेच तरुण पिढीला व्यवसाय करायचा असेल तर कॉपीराइट आणि ट्रेडमार्क याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयाचे ज्ञान असल्यास विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजना जाधव यांनी तर आभार डॉ. एम. एन. रास्ते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल पवार यांनी केले. कार्यक्...
सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?
सिटिझन जर्नालिस्ट

सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?

निगडी मधील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूब रित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतू अलीकडेच काही व्यावसायिकांनी सदर पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी 'खाऊ गल्ली' चालू केली आहे.तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार चालू केला आहे. जर का निगडी उड्डाणपुलाखाली ' खाऊ गल्लीच' उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे. दिपक खैरनार...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन
पुणे, सामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले निर्माल्य संकलन

हडपसर : (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अनंत चतुर्दशीनिमित्त निर्माल्य संकलनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हडपसर परिसरातील गणपतींचे हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून सहकार्य केले. यावेळी निर्माल्य संकलन करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमास प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. ऋषिकेश खोडदे, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवून जनजागृतीचे कार्य केले....
एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते....
भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी मधील इंडस्ट्रीज उद्योजक व कामगार यांनी आम आदमी प्रवेश केला. आपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते व आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल महादेव टाकळे (दिघी), सुरेश बाबू कांबळे (भोसरी), गौतम भगवान इंगळे (काळेवाडी), सुनील सूर्यकांत शिवशरण (भोसरी), पांडुरंग जगन्नाथ राऊत (भोसरी), बालाजी शामराव कांबळे (भोसरी), राहुल झोटिंग कांबळे (मोशी) आदींनी प्रवेश केला. या वेळी आप पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डाॅक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, आप महिला नेत्या सिता केंद्रे, कमलेश रनावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंडस्ट्रीज उद्योजक पांडुरंग राऊत, सुरेश कांबळे व आनिल टाकळे यांनी भाजप सरकार वरती नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जाणे हे महार...
पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांचा निर्धार पिंपरी, ता. 23 : पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या (MSCDA) पॅनलला मताधिक्य देणार आहे. असा ठाम विश्वास केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदच्या निवडणुकीचा अंतीम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी आमदार अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जग्गनाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड तर्फे सभा आयोजित केली होती. त्यावेळी विवेक तापकीर बोलत होते. या सभेला माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, विजय पांडुरंग पाटील, एमएससीडीए पश्चिम क्षेत्राचे अध...
राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण तर अब्दुल शेख याची एक सुवर्ण पदकांची कमाई
क्रीडा

राष्ट्रीय स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण तर अब्दुल शेख याची एक सुवर्ण पदकांची कमाई

पिंपरी : छत्तीसगड मुख्यमंत्री चषक आणि पहिला AITWPF फेडरेशन कप २०२२, राष्ट्रीय पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन चॅम्पियनशिप, जी सरदार बलबीर सिंग जुनेजा इनडोर (एसी) स्टेडियम, रायपूर, छत्तीसगड येथे १२ ते १५ तारखेदरम्यान आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय स्पर्धेत १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५१८ खेळाडूंनी भाग घेतला. हा कार्यक्रम छत्तीसगड पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन असोसिएशनने आयोजित केला होता आणि अखिल भारतीय पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन फेडरेशन AITWPF द्वारे मान्यता दिली होती. या चॅम्पियनशिपमध्ये, मणिपूर राज्याने पारंपारिक कुस्ती आणि पँक्रेशन चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि CM ट्रॉफी आणि पहिला फेडरेशन कप २०२२ जिंकला, म्हणजे हरियाणा आणि नागालँडने पारंपरिक कुस्तीमध्ये अनुक्रमे २ रे आणि ३ रे स्थान जिंकले. आणि केरळ आणि छत्तीसगडमध्ये पँक्रेशन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क...