Tag: SM Joshi College

वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणून अंधश्रद्धेला जीवनात स्थान देऊ नये | एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांचे प्रतिपादन
पुणे

वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणून अंधश्रद्धेला जीवनात स्थान देऊ नये | एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांचे प्रतिपादन

हडपसर (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करा. प्रदूषणमुक्त विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी विज्ञानाच्या प्राध्यापकानी प्रयत्न करावेत. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आचरणात आणावा. अंधश्रद्धेला आपल्या जीवनात स्थान देऊ नये. विज्ञानाच्या क्षेत्रात शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे आपण कष्ट समजून घेतले पाहिजेत. काळानुरूप बदलणार्‍या संशोधन पद्धती आपण समजून घेतल्या तरच भविष्यातील संशोधनाची वाटचाल सुकर होईल, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्टुडेंट टीचर असोसिएशन्स सेल व सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी केमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. गजानन...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ वर परिसंवाद
शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ वर परिसंवाद

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमध्ये १७ फेब्रुवारी रोजी, अर्थशास्त्र विभाग आणि ग्लोबल रिसर्च अँड ट्रेनिंग फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्पावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. १ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यानी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सरकारी खर्च आणि उत्पन्न याबाबतच्या तरतुदी वर चर्चा करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एकनाथ मुंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुणे आणि साधन व्यक्ती यांची ओळख करून दिली. ग्लोबल रिसर्च अँड ट्रेनिंग फोरमचे संचालक डॉक्टर रतिकांत रे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची मुख्य कल्पना डॉक्टर रतिकांत रे यांनी मांडली. डॉक्टर विजय ककडे यांनी अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक धोरण व त्याच्या अंमलबजावणीवर भाष्य केले.&n...
प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान
पुणे, शैक्षणिक

प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील वाणिज्य विद्याशाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन भानुदास भागवत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ.अर्जुन भागवत यांचा संशोधनाचा विषय "शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या कल्पक प्रकल्पांचे व्यवस्थापन : एक तुलनात्मक अभ्यास " हा होता. नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधील अकाउंटन्सी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर सानप यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यु .ए. सी प्रमुख प्रा. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन ...
प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान
यशोगाथा, शैक्षणिक

प्रा. सुरेश भोसले यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान

हडपसर : एस. एम. जोशी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. सुरेश दगडू भोसले यांना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. ची पदवी प्रदान केली आहे. त्यांनी ''अ स्टडी ऑफ सल्स टाइपोलॉजी विथ रेफरन्स टू द सेलेक्टेड नॉव्हेल्स ऑफ अरविंद अडीगा खलीद हुसेनी श्याम सेलवादुराई'' या विषयात संशोधन केले आहे. त्यांना डॉ. सुधीर मठपती यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यू. ए.सी.चे प्रमुख डॉ. किशोर काकडे, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शहाजी करंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले....
दिल्ली येथील आरडी परेडसाठी तेजस मोरे, संकेत यादव, ऋतुजा दळवी यांची निवड
शैक्षणिक, पुणे

दिल्ली येथील आरडी परेडसाठी तेजस मोरे, संकेत यादव, ऋतुजा दळवी यांची निवड

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील तेजस मोरे, संकेत यादव यांची २६ जानेवारी रोजी झालेल्या राजपथ परेडसाठी तर ऋतुजा दळवी हिची दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या प्राईम मिनिस्टर दिल्ली रॅलीसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कॅडेट्सला एन.सी.सी.चे लेफ्ट. प्रा. रमेश गावडे यांनी मार्गदर्शन केले. एन.सी.सी.च्या कॅडेट्सच्या या यशामध्ये महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचा मोलाचा सहभाग आहे....
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन जुडो स्पर्धेचे आयोजन
क्रीडा

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन जुडो स्पर्धेचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुले काटक असतात. त्यांनी कठोर परिश्रम करून खेळातील संधी ओळखून त्याचा लाभ घ्यावा. त्यांनी खेळाचे नेतृत्व करावे. covid-19 च्या नियमांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करावी, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीपआबा तुपे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून विचार व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालय जुडो स्पर्धेत (मुले-मुली) बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे क्रीडा समितीचे सचिव डॉ. रमेश गायकवाड यांनी मोलाचे विचार व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे खिलारे साहेब यांनी व्यक्त केले. खेळातूनच खिलाडूवृत्ती येते. निकोप शरीरात, निकोप मन वसत असते. युवकांनी खेळ खेळून आरोग्य उत्तम ठेवावे. असे विचार व्यक्त केले. स्पर्धेचे संयोजन क्रीडा संचालक प्रा....
एस. एम .जोशी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास राज्यस्तरीय व्याख्यानमाला संपन्न
पुणे

एस. एम .जोशी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास राज्यस्तरीय व्याख्यानमाला संपन्न

 हडपसर (प्रतिनिधी) : आजादी का अमृत महोत्सव व युवा सप्ताहानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमधील आय.क्यू.ए.सी. ग्रंथालय विभाग व हेरिटेज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास या विषयावर ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमाला दिनांक 14 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या वयात अभ्यास करून आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर केले पाहिजे. समाजाची सेवा करायची असेल तर अधिकारी या पदावर जाण्याची गरज आहे. त्यातून आपण समाजाचे ऋण फेडू शकतो. असे विचार व्यक्त केले. हेरिटेज फाउंडेशनचे डायरेक्टर भुजंग बोबडे म्हणाले अभ्यासातूनच आपण आपल्याला सिद्ध केले पाहिजे. ग्रंथालयातील व ऑनलाईन पुस्तके वाचून...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘काव्य संमेलन’ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘काव्य संमेलन’ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : कवितेमधून कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असतो. कवितेत एक अद्भुत शक्ती आहे. युवकांनी साहित्याचे वाचन केले पाहिजे. साहित्य मनाची मशागत करते. आभासी विश्वातही कविता आनंद देत आहे. साहित्यिकांच्या सहवासात काव्य मैफिलीतून आनंद मिळतो. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या काव्य संमेलनात अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम व वैश्विक कला पर्यावरण औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हॉलंडचे सुप्रसिद्ध कवी व चित्रकार भास्कर हांडे यांनी या संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. या काव्य संमेलनात कवी अनंत राऊत (पुणे), कवी ज्ञानेश्वर तिखे (इंदोर), कवी बा...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये लसीकरण शिबिराला उत्तम प्रतिसाद
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये लसीकरण शिबिराला उत्तम प्रतिसाद

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी covid-19 लसीकरण शिबिर 15 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या लसीकरण शिबिराचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी नियमित मास्क वापरला पाहिजे. स्वतःच स्वतःची काळजी घ्या. लसीकरणाची सुविधा महाविद्यालयात सुरू झाली आहे. त्याचा लाभ घ्या. असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.शंतनू जगदाळे यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी दिलीप आबा तुपे होते. या लसीकरणासाठी कार्यक्रमाचे संयोजन प्रा. तृप्ती हंबीर, प्रा. विक्रम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री यांनी केले. आभार डॉ. संजय जगताप यांनी मानल...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

हडपसर (प्रतिनिधी) : डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पश्चिम विभागाच्या वतीने ऑनलाइन शोकसभेचे आयोजन एस. एम. जोशी कॉलेजमध्ये करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. राम कांडगे शोकसभेत म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर याच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारा शिक्षण महर्षी हरपला. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एन. डी. पाटील यांचे अनेक पैलू उलगडून दाखवले. रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे म्हणाले की, डॉ.एन. डी. पाटील हे विचारवंत होते. कृतीशील कार्यकर्ते होते. समाजाशी नाळ जोडलेले, वैचारिक अधिष्ठान असणारे, कर्मवीरांच्या विचारांचा वारसा चालवणारे कर्मयोद्धे होते. आपला विचार व कार्याशी प्रामाणिक असणारे एन .डी. पाटील हे अभ्यासू होते. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या शोकसभेत प्राचार...