एस.एम. जोशी महाविद्यालयात ‘गुगल क्लासरूम-अ टूल फॉर टीचिंग अँड लर्निंग’ प्रशिक्षण संपन्न
हडपसर : दि. ९ डिसेंबर (प्रतिनिधी) : ‘गुगल क्लासरूम-अ टूल फॉर टीचिंग अँड लर्निंग’ या विषयावर एस.एम.जोशी महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
https://youtu.be/yEcSL2C43x4
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्राद्यापक डॉ. किशोर काकडे यांनी केले. या प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.एकनाथ मुंढे यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांना गुगल क्लासरूमचा शैक्षणिक साधन म्हणून कसा वापर करावा याबाबतचे प्रशिक्षण दिले. तंत्रज्ञानाप्रमाणे आपणही आपल्यात बदल केला पाहिजे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत वापर केला पाहिजे. असे विचार डॉ. एकनाथ मुं...