एस. एम. जोशी कॉलेजमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
हडपसर (प्रतिनिधी) : डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पश्चिम विभागाच्या वतीने ऑनलाइन शोकसभेचे आयोजन एस. एम. जोशी कॉलेजमध्ये करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे शोकसभेत म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकर याच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारा शिक्षण महर्षी हरपला. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एन. डी. पाटील यांचे अनेक पैलू उलगडून दाखवले.
रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे म्हणाले की, डॉ.एन. डी. पाटील हे विचारवंत होते. कृतीशील कार्यकर्ते होते. समाजाशी नाळ जोडलेले, वैचारिक अधिष्ठान असणारे, कर्मवीरांच्या विचारांचा वारसा चालवणारे कर्मयोद्धे होते. आपला विचार व कार्याशी प्रामाणिक असणारे एन .डी. पाटील हे अभ्यासू होते. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या शोकसभेत प्राचार...