एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
हडपसर : महाराष्ट्र ही संतांची पंडितांची व शाहिरांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी ही साहित्यासाठी सकस भूमी आहे . साठोत्तरी काळातील साहित्यात वास्तव जीवन मोकळेपणाने व्यक्त झाले . शोषितांचे जीवन या साहित्यातून व्यक्त झाले. नव्या लेखकांनी आपल्या लेखणीतून नवा समाज उभा केला पाहिजे. असे विचार नेदरलँडचे कवी व चित्रकार मा. भास्कर हांडे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथील मराठी विभाग आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये "मराठीतील 1960 नंतरचे विविध वाड्मयीन प्रवाह व सद्यस्थिती" या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या वेबिनारचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, कलावंत हा माणसाच्या कल्याणाचा विचार करतो. तो शांतीचा प्रतीक असतो. साहित्य माणसाला जोडण्याचे काम कर...