उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले
दिव्यांगांच्या उन्नतीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन सदैव प्रयत्नशील - डॉ. कुंदाताई भिसे
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) : स्व. राहुल शामराव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू ओंकार जोशी आणि पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र येथे विशेष (दिव्यांग) मुलांच्या माता आणि भगिनींसाठी नुकतेच विनामूल्य एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीस पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या उपक्रमांतर्गत मोठ्या संख्यने विशेष मुलांच्या माता आणि भगिनींनी संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषणमुक्त वातावरणात आणि आनंदात घालवला. तसेच तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, ओंकार जोशी, अंजनवेल कृषी पर्यटनचे राहुल जगताप, सप्त...