
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस विविध लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या कारवाईला दुजोरा दिला.
बडतर्फ कर्मचार्यांमध्ये एलसीबीचे सहाय्यक फौजदार मिलिंद केदार, अनिल भगवान महाजन (फैजपूर) व भास्कर नामदेव चव्हाण (मारवड) यांचा समावेश आहे.
मिलिंद केदार यांनी पती-पत्नीच्या वादात पतीला मदत करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात २० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती, तर अनिल महाजन यांनी दारूच्या अवैध धंदे चालकाकडून सप्टेंबर महिन्यात ५०० रुपयांची लाच घेतली, तसेच भास्कर चव्हाण यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी अमळनेरच्या सरकारी निवासस्थानीच १५ हजारांची लाच घेतल्याने तीनही पोलीस कर्मचार्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केले.
- HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.
- Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी
- PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक
- HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे
- Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र