वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी पदवी प्रदान

वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी पदवी प्रदान

पिंपरी : चिंचवड गावातील वेदमूर्ती चंद्रशेखर गोविंदतात्या रबडे यांचे चिरंजीव वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी ही पदवी वेदमूर्ती दिनकर भट्ट फडके गुरुजी पुणे, व वेदमूर्ती योगेश बोरकर गुरुजी गोवा, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

पिंपरी चिंचवडमध्ये आजतागायत षडंगवित घनपाठी ही पदवी मिळविणारे वेदमूर्ती विनायक रबडे एकमेव आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचाही सन्मान करण्यात आला. वयाच्या बाराव्या वर्षी ऋग्वेद दशग्रंथ घनपाठ, हा एकच ध्यास धरून कशाचीही पर्वा न करता सलग १८ वर्षे त्यांनी ऋग्वेद गुरुकुल पाठशाळेत वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांचेकडे अध्ययन केले. त्यांच्या अथक परिश्रमाने हा सन्मान मिळाला असल्याचे त्यांचे बंधु कौस्तुभ रबडे यांनी सांगितले.

वेदमूर्ती विनायक रबडे यांना षडंगवित घनपाठी पदवी प्रदान