पुणे : रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत “दक्षता जागृती सप्ताहाचे” आयोजन करण्यात आले होते.
‘सतर्क भारत – समृद्ध भारत’ ही संकल्पना घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत शासनाने निर्देशित केल्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात कार्यालयाच्या दर्शनी भागात मोजक्या ठिकाणी भित्तीपत्रक व कापडी फलक लावण्यात आले. तसेच दक्षता जनजागृतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा परीक्षा घेण्यात आली.
भ्रष्टाचार मुक्ततेसंदर्भात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दक्षता जागृती सप्ताहानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय नगरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख सुशीलकुमार गुजर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अतुल चौरे तसेच सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग घेतला.९या