हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रथम महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करुन ‘ईवेस्ट कचऱ्याची समस्या’ या विषयावर अत्यंत प्रभावी पथनाट्य तयार केले. त्यानंतर हडपसर येथील साधना संकुलातील शाळा व माळवाडी गावात जावून पथनाट्य सादर केले. या पथनाट्यास विद्यार्थी व नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पथनाट्याचे संवाद व दिग्दर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विराज नवले याने केले. या पथनाट्यात १६ विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२० स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता केली. अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी दिली. पथनाट्याचे सादरीकरण करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ऋषिकेश खोडदे, डॉ.दिनकर मुरकुटे, डॉ.निशा गोसावी, डॉ.राजेंन्द्र ठाकरे, डॉ.विश्वास देशमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य डॉ.अतुल चौरे, प्रा.फुलचंद कांबळे, प्रा.स्वप्नील ढोरे, डॉ.नम्रता मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले.