हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमध्ये कार्यालयीन सेवकांसाठी तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रम स्टाफ वेल्फेअर कमिटी व स्टाफ अकॅडमी कमिटीने यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे यांनी डेड स्टॉक रजिस्टर मेंटेनन्स या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यालय हा महाविद्यालयाचा आरसा असतो. महाविद्यालयात उपयोगात न येणाऱ्या (डेड स्टॉक) वस्तूंची नोंद ठेवली पाहिजे. आपले कामकाज गतीने होण्यासाठी व्यवस्थित रेकॉर्ड नियोजन केले पाहिजे. असे मत डॉ. किशोर काकडे यांनी व्यक्त केले.
रसायनशास्त्र विभागाचे प्रा. के. बी. पठाडे यांनी ‘सेफ्टी सेक्युरिटी स्किल्स’ या विषयावर बोलताना म्हणाले की, प्रयोगशाळेत काम करताना विद्यार्थी व प्राध्यापकांनी कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. काही रसायने धोकादायक व प्राणघातक असतात. त्यामुळे प्रयोगशाळेत वेशभूषा वेगळी करावी असे मत व्यक्त केले. सातारा इंजीनियरिंग कॉलेजचे आय.टी.सेलचे प्रमुख प्रा. दांगट जी. डी. यांनी ‘डिजिटल टेक्नॉलॉजीकल स्किल’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले, कार्यालयीन सेवकांनी वेळेचे व्यवस्थापन उत्तम करावे, डेडस्टॉक, सेक्युरिटी, डिजिटल टेक्नॉलॉजी याविषयी जाणून घेऊन आपले काम उत्तम करावे. त्यामुळे ऑफिसमधील पर्यावरण सकारात्मक राहते. अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे नियोजन डॉ. अशोक पांढरबळे, स्टाफ अकॅडमीचे प्रमुख डॉ.करांडे एस. आर. यांनी केले. डॉ.अतुल चौरे, डॉ.सुनील खुंटे, प्रा. घोडके जी.के., प्रा.जाधव पी. एन. यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यालय अधीक्षक श्री परदेशी एस.ए. व कार्यालयीन सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल पवार यांनी केले.