- युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरीत फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष
पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२३ : सुप्रीम कोर्टाच्या राहुल गांधी यांच्यावरील निर्णयाने लोकांचा न्यायालयावरील विश्वास बळकट झाला आहे. असे प्रतिपादन युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.
मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने कायम केलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. त्यावेळी चंद्रशेखर जाधव बोलत होते.
याप्रसंगी प्रदेश सचिव गौरव चौधरी, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, विक्रांत सानप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, वसीम खान व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, “उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही. असं आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. यावरून गुजरात न्यायालय हे पक्षपाती असल्याचे सिद्ध झाले आहे. “
” यामुळे या सर्वांची जबाबदारी घेऊन गुजरातच्या न्यायमूर्तीनी तातडीने राजीनामा द्यावा तसेच नको इतकी तत्परता दाखवणारे भाजपचे एजंट ओम बिर्ला यांनी देखील आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.